• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भामटेगिरीचा ‘धंदा’ आणि समाजसेवेचा मुखवटा!

admin by admin
February 4, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव शहरात एक ‘धंदा’ चांगलाच तेजीत आहे—सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा! कोणतेही ठोस पुरावे नसताना, मोठमोठ्या नावांचा वापर करत, खोट्या तक्रारी दाखल करून सरकारी यंत्रणांना जखडून टाकणाऱ्या टोळक्यांचे फावते आहे. आता तर या धंद्याने इतका कहर केला आहे की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातही काही जण संधी शोधून पैसे उकळायला निघाले.

आयत्या बिळावर नागोबा!

या सर्व प्रकरणात एक नाव पुढे आले—आशिष विशाळ! हा इसम स्वतःला आमदार सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचे सांगतो. आणि मग याचा पुढचा कारनामा ऐकाच—सरकारी अधिकाऱ्यांना ‘देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे’ असे सांगून थेट खंडणी मागणे! पण यावेळी तो गंडला. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला, आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

पत्राशिवायच पत्र!

या भामट्याने केवळ हाच उद्योग केला नाही. धाराशिवमध्ये त्याने मोठमोठ्या नावांचा धाक दाखवत सरकारी अधिकाऱ्यांवर खोट्या तक्रारी दाखल करण्याचा सपाटा लावला. आणि गंमत म्हणजे, ह्या तक्रारी आमदार सुरेश धस यांच्या नावाने लिहिलेल्या असायच्या—त्यांच्याच लेटरपॅडवर! चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिकारी त्याला पैसे द्यायचे आणि या माणसाची पोळी भाजत जायची. गेली दोन वर्षे हा गोरखधंदा सुरू होता.

ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री!

धाराशिवसारख्या तुलनेने शांत जिल्ह्यात काही लोकांनी ‘ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री’च सुरू केली आहे. एका माजी मुख्याधिकाऱ्यालाही अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले. तक्रारींचा धाक दाखवून आणि प्रकरणे मिटवायचे नाटक करून त्याने स्वतःला आलिशान गाडी घेऊन दिली. हे सगळे ‘समाजसेवेच्या’ नावाखाली सुरू होते. पण खरा प्रश्न असा आहे की, या सगळ्या प्रकाराला आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा होता का?

समाजसेवा की खंडणी सेवा?

धाराशिवमध्ये उद्योगधंदे फारसे नाहीत. त्यामुळे काही भामटे सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच ‘उद्योग’ बनवून बसले आहेत. तक्रारींची टांगती तलवार लावायची, चौकशीचा बडगा उगारायचा आणि मग पैसे घेऊन प्रकरण मिटवायचे! हा धंदा दिवसेंदिवस फोफावत आहे.

वेळीच सावध व्हा!

सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही आता सावध होण्याची वेळ आली आहे. जर कोणी असे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तडजोड करण्याऐवजी सरळ पोलीस ठाणे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार करणे गरजेचे आहे. नाहीतर ‘समाजसेवेचा’ मुखवटा घालून असे भामटे बळी शोधतच राहतील!

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

आ. सुरेश धस यांच्या नावावर खंडणी उकळणाऱ्या ‘बनावट पीए’चा पर्दाफाश

Next Post

विशेष कार्यकारी अधिकारी : झेरॉक्सवाल्यांच्या सोनेरी दिवसांची पुनरावृत्ती!

Next Post
विशेष कार्यकारी अधिकारी : झेरॉक्सवाल्यांच्या सोनेरी दिवसांची पुनरावृत्ती!

विशेष कार्यकारी अधिकारी : झेरॉक्सवाल्यांच्या सोनेरी दिवसांची पुनरावृत्ती!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण

October 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : मंदिरासमोर तेलंगणातील भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लांबवली

October 26, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला
  • वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण
  • माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण
  • तुळजापूर : मंदिरासमोर तेलंगणातील भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लांबवली
  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!