• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आ. सुरेश धस यांच्या नावावर खंडणी उकळणाऱ्या ‘बनावट पीए’चा पर्दाफाश

 – चोपाचा व्हिडीओ व्हायरल!

admin by admin
February 4, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”
0
SHARES
841
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, त्यांच्या या लढ्याचा गैरफायदा घेत धाराशिवचा ‘ब्लॅकमेलर’ आशिष विसाळ अधिकाऱ्यांना गंडवत होता!

हा भामटा “मी आ. सुरेश धस यांचा खासगी पीए आहे” असं सांगत सरकारी अधिकाऱ्यांना “देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करा” असे सांगून खंडणी मागत होता. मात्र, मराठा कार्यकर्त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार हेरून त्याला भरचौकात तुडवले! या मारहाणीतून जीव मुठीत घेऊन बचावलेला विसाळ सध्या पोलीस ठाण्यात आहे, पण त्याचा चोपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

धस यांची भीती दाखवून दोन वर्षांचा ‘गोरखधंदा’!

विसाळ याने गेली दोन वर्षं आमदार सुरेश धस यांच्या नावाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा मोठा धंदा उभा केला होता. तो धाराशिव जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी करायचा. त्या तक्रारींवर चौकशी सुरू झाली की, कर्मचारी घाबरून ‘सेटलमेंट’च्या नावाखाली पैसे द्यायचे.

त्याच्या या धंद्याने इतकं टोक गाठलं की, नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनाही ब्लॅकमेल करून स्वतःचं ‘कल्याण’ करून घेतलं!

‘बांधकाम तक्रारीतून कमाई – १८ लाखांची गाडी, भरघोस बँक बॅलन्स’

बांधकाम परवानग्यांमध्ये त्रुटी दाखवून पूजा प्रसाद पाटील आणि बांगड बांधकाम प्रकरणी तक्रारी केल्या आणि त्यातून खंडणी वसूल करून तब्बल १८ लाखांची गाडी खरेदी केली. इतकंच नव्हे, तर खासगी बँकेत २ कोटींची ठेव टाकून तो मोठ्या रुबाबात फिरत होता.

‘आ. सुरेश धस यांच्या आशीर्वादाने?’ – मोठा प्रश्नचिन्ह!

आता या संपूर्ण प्रकारानंतर “विसाळच्या या कारवायांना आ. सुरेश धस यांचा आशीर्वाद होता का?” हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. धस यांना याबाबत माहिती होती का? त्यांनी यावर काय भूमिका घेतली?” याचा लवकरच खुलासा होणे गरजेचे आहे.

पोलिस तपासाचा वेग वाढला – आणखी ‘गुपितं’ बाहेर येणार?

विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ व्यवसाय फक्त धाराशिवपुरता मर्यादित नव्हता का? आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांना गंडवले? कोणकोणत्या राजकीय नेत्यांची नावं यात वापरली? याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

➡ धाराशिवकरांमध्ये खळबळ – आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता!

 

Previous Post

“बोगस लेटरपॅड, खोटी सही आणि ‘चौकशीचा धाक’

Next Post

भामटेगिरीचा ‘धंदा’ आणि समाजसेवेचा मुखवटा!

Next Post
“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”

भामटेगिरीचा ‘धंदा’ आणि समाजसेवेचा मुखवटा!

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापुरात ८ पुजाऱ्यांवर बंदीची कुऱ्हाड, तंबाखू खाऊन थुंकणे पडले महागात!

July 3, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

July 3, 2025
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कोर्ट, भाजप कार्यालय परिसरातून तीन वाहने लंपास

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group