धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो म्हणून झालेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणात नळदुर्ग पोलिसांनी येत्या दोन दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
“धाराशिव लाइव्हच्या बातम्यांनी दिली दिशा!”
धाराशिव लाइव्हमध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध होताच, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी सोमवारी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सरोदे यांची भेट घेतली आणि या प्रकरणात त्वरीत कारवाईची मागणी केली.
- पोलिसांनी “ज्यांनी फसवणूक केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल” असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
- तसेच फसवणूक झालेल्या तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“प्रकरण अंगलट येताच मोबाईल शॉपीवाल्याची गयावया सुरू!”
- पोलिसांचा दबाव वाढू लागताच मोबाईल शॉपीवाल्याने दोन तरुणांना पैसे परत करण्यासाठी चेक दिल्याचे समोर आले आहे.
- आता “आम्ही प्रतिष्ठित आहोत, आमची इज्जत घालवू नका” असे म्हणत गयावया सुरू आहे.
“फसवणूक झालेल्या तरुणांवर दबावतंत्र!”
- काही तरुणांनी तक्रार देण्यासाठी पुढाकार घेताच त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.
- “पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर पैसे बुडाले म्हणून समजा!” अशा धमक्या दिल्या जात आहेत.
- म्हणजेच पैसे लुबाडायचे आणि पोलिसांवर दबाव टाकून गप्प बसवायचे, हा डाव आखला जातोय!
फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
“गुन्हा दाखल होईल, पण पोलीस दबावाला बळी पडणार का?”
नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले असले तरी हा गुन्हा प्रभावशाली लोकांवर होणार का, की छोटे मोहरेच बळी पडणार?
फसवणूक झालेल्या तरुणांनी कोणत्याही दबावाला न जुमानता पुढे यावे आणि पोलिसांत तक्रार नोंदवावी.
या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!