धाराशिव – ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष व त्यावरील आहे व ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2 लक्ष 50 रुपयांच्या आत आहे,अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिर्थदर्शन घेण्यासाठी देशातील तिरुपती बालाजी,गंगोत्री मंदिर (उत्तराखंड),केदारनाथ मंदिर (उत्तराखंड), काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी,श्रीराम मंदिर,अयोध्या,महाबोधी मंदिर,गया,अजमेर दर्गा (राजस्थान) आणि बद्रीनाथ मंदिर, उत्तराखंड या तिर्थस्थळाची निवड करण्यात आली आहे.तिर्थदर्शन योजनेसाठी अर्ज ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे आणि नगरपालिका कार्यालयात स्विकारण्यात येतील.
मन:शांतीसह आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावरील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्यांचे वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना व ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजाराच्या आत आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मीक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.अशा ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी समाज कल्याण,सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त असलेल्या तालुकानिहाय वसतीगृहात अर्ज सादर करावे. योजनेची माहिती,अर्जाचा नमुना व सोबतची प्रपत्रे कार्यालयासह http://samajkalyandharashiv.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ठिकाणी अर्ज सादर करावे
योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी खालील कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह धाराशिव कर्मचारी बी.ए.नाईकनवरे (7083408388),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नळदुर्ग कर्मचारी मोहन शिंदे (9422923043),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह लोहारा कर्मचारी शरद माळी (7350650720),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह कळंब कर्मचारी संजय कांबळे (9960489663),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह परंडा कर्मचारी प्रभाकर शेळके (7020634706), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह उमरगा कर्मचारी सुनंदा जेजुरे (9552446717), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वाशी कर्मचारी नासेरखान पठाण (8888142867), अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,मुरुम ता.उमरगा कर्मचारी दत्तात्रय कुंभार (9420831482),अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,गोलेगाव ता.भुम कर्मचारी अण्णासाहेब शितोळे (9022039237), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह तुळजापूर कर्मचारी पी.एस.राजपुत (8208566972) येथे अर्ज करावेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.