• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 2, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भाऊंची, ताईंची आणि आप्पांची आता लॉटरी लागेल का?

admin by admin
September 15, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीचा मौसम सुरु झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक गावातील चहा टपरीवर चर्चा एकच – “आप्पा निवडणूक लढणार का? आण्णा फॉर्म भरतील का? भैय्या यांना पुन्हा संधी मिळणार का?”

धाराशिव विधानसभा मतदारसंघ: शिंदे गट आणि भाजपचे नेते आता रोज एकमेकांना “तुमच्या अंगात किती बळ आहे?” याचे प्रमाणपत्र देत आहेत. त्यात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शिंदे  गट आणि भाजप यांच्यात चालू असलेली कोंबडीची झुंज पाहून मनातल्या मनात हसत आहेत. एकीकडे नव्याने शिंदे गटात आलेले “आप्पा” यांना रात्री स्वप्न पडतंय की ते विधानसभेत गाठीशी कार्यकर्ते घेऊन चाललेत, दुसरीकडे आण्णा विचार करतायत, “आपलं आता तरी नशीब लागेल का?”

तुळजापूर मतदारसंघ: भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या भोवती आधीच ताई-दाजींनी बेत लावून ठेवले आहेत. भाऊंच्या तोंडून फक्त एकच प्रश्न – “माझा नंबर कधी येणार?” इतकेच नाही, तर ८५ वर्षीय जुने साहेब, ज्यांना “तुम्ही निवडणूक सोडा” सांगितलं तरी तेच म्हणतात, “अरे, हा माझा अखेरचा घोडा आहे!” साहेबांना धावण्याचं काही सोडायचं नाही, त्यांची तगडी इच्छा आहे की पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं.

परंडा मतदारसंघ: येथे शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे गटाचे तात्या आणि राष्ट्रवादीचे भैय्या एकत्र आलेत. पण ही निवडणूक नाही, तर जणू कुस्तीची आखाडा झालाय! तात्या आणि भैय्या दोघेही गावाच्या क्रीडांगणात रोज कुस्तीची तयारी करतायत आणि तानाजी सावंत मैदानात “हे सगळे फेकुना मागे ठेवीन” अशा निर्धाराने उतरलेत.

उमरगा मतदारसंघ : येथे शिंदे गटाचे आ. ज्ञानराज चौगुले यांना घेरण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यात कुस्ती सुरु झाली आहे. प्रत्येकजण म्हणतोय मीच चौगुलेना आस्मान दाखवू शकतो, पण मागील तीन निवडणुकात अनेकजण उताणे पडलेत. प्रत्येक निवडणुकीत नवा भिडू रणांगणात उतरतोय, आता कुणाचा नंबर लागेल, याची चर्चा सुरु आहे.

अपक्षांची तयारी: अनेक अपक्ष तयार आहेत! कोण बाशींग लावून तर कोण टोपी घालून मैदानात उतरायला उत्सुक आहेत. फक्त मतदारसंघातील इथला प्रत्येक जण आता एका प्रश्नावर एकवटला आहे – “यावेळी कोण आमदार होईल?” आणि दुसरं – “भाऊंची, ताईंची आणि आप्पांची आता लॉटरी लागेल का?”

आता इकडे मतदार म्हणतात, “राजकारणी लोकांना बघून आमचं डोकं फिरतं, पण या सर्कशीतलं कोण जिंकेल, हे पाहायला मजा येईल!”

  • बोरूबहाद्दर
Previous Post

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना / लाभासाठी याठिकाणी अर्ज करा

Next Post

तुळजापूरची महाभारत कथा आणि भाऊंचं आमदारकीचं स्वप्न !

Next Post
महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

तुळजापूरची महाभारत कथा आणि भाऊंचं आमदारकीचं स्वप्न !

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग : शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मोह नडला; सावकारांच्या त्रासाला कंटाळून बँक अधिकाऱ्याने रचला लुटीचा बनाव

July 2, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

 नळदुर्ग लोकमंगल बँक कर्मचारी बनाव प्रकरण: अखेर गूढ उकलले, २५ लाखांसह कर्मचारी गजाआड

July 1, 2025
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

पोलिस कर्मचाऱ्याने मागितली 4 लाखांची लाच; एसीबीच्या जाळ्यात अडकला

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group