येरमाळा पोलीसांनी 2 सप्टेंबर रोजी रात्री शाहीद रफीक कुरेशी यांना पिकअप वाहनातून तीन जर्शी गायींची बेकायदेशीर वाहतूक करताना अटक केली. गायींची किंमत अंदाजे 2.77 लाख रुपये असून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कुरेशी यांच्यावर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-शाहीद रफीक कुरेशी, वय 19 वर्षे, रा. राशिन ता. कर्जत जि. अहमदनगर हे दि 02.09.2024 रोजी 21.16 वा. सु. बिड ते धाराशिव जाणारे एनएच 52 हायवे रोडलगत साई मोटार गॅरेज जवळ चिंचेच्या बागेजवळ जवळ पिकअप वाहन क्र एमएच 42 बीएफ 2098 चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहनात एकुण 2, 77, 000 ₹ किंमतीच्या 3 जर्शी गायी कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11 (1)(एफ) (डी))(एच)(के) मपोका कलम 119, म.पो.अ.83/177,184 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(अ) (1) (2), 5(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरीकडे, धाराशिव शहर पोलिसांनी संदीप नागनाथ माने यांना पडक्या कत्तलखान्याजवळ तीन जर्शी गायी बांधून ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली. माने यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-संदीप नागनाथ माने, वय 34 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, ह.मु. एस टी कॉलनी भवानी चौक धाराशिव यांनी दि 02.09.2024 रोजी 21.50 वा. सु. किरणा मळा येथील पडक्या कत्तल खान्याजवळ धाराशिव येथे त्याचे ताब्यातील तीन जर्शी गायी या बांधून ठेवलेल्या असताना धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.