कळंब: कळंब बस स्थानकासमोरील एका बियर बारच्या वरील लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लॉजवर शाळकरी मुलींची ये-जा असल्याचेही निदर्शनास आले आहे. पोलीस या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि शाळेच्या परिसरात असा अनैतिक व्यवसाय चालत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या लॉजवर तातडीने कारवाई करून वेश्याव्यवसाय बंद करावा आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांच्या कथित दुर्लक्षाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.