कळंब :आरेापी नामे- 1) जयंत कल्याणराव चौरे, तळे पिंपळगाव, ता. पाटोदा जि. बीड,2)डॉ.जगदीश पाटील रा. पुणे, 3) डॉ. विनोद कालीरमना रा. हरीयाना यांनी दि. 11.10.2023 रोजी 16.00 वा. सु. पोल्ट्री फॉर्म इटकुर ता. कळंब येथे फिर्यादी नामे- श्रीकृष्ण अरुण अडसुळ, वय 29 वर्षे, रा. ईटकुर, ता. कळंब जि. धाराशिव यांनी नमुद आरोपी यांना कोंबड्याच्या अंड्याच्या उत्पादनात होणाऱ्या घट बाबात स्कायलार्स बोन्स कंपनीच्या पोल्ट्री फॉर्मला भेट देण्यासाठी वांरवार फोन करुन बोलावले परंतु नमुद आरोपी हे आले नाही.
यावर फिर्यादी यांनी नामुद आरोपी यांचे वरिष्ठ स्कायलार्स बोन्स कंपनीचे जी. एम. डॉ. विनोद कालीरमना रा. हरियाणा यांच्याकडे तक्रार का केली या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीकृष्ण अडसुळ यांनी दि.12.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी चोरी
उमरगा : फिर्यादी नामे- महेबुब शेरुमिया शेख, वय 30 वर्षे, रा. इंदीरानगर अहमदपुर जि. लातुर हे दि. 12.10.2023 रोजी 15.00 ते 15.30 वा. सु. उमरगा बसस्थानक येथे बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने महेबुब शेख यांचे शर्टच्या खिशातील अंदाजे 5,000₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेबुब शेख यांनी दि.12.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :फिर्यादी नामे-कलावती किसन माने, वय 60 वर्षे, रा. हरी जवळगा ता. निलगा जि. लातुर या दि. 12.10.2023 रोजी 13.45 वा. सु. उमरगा बसस्थानक येथे बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने कलावती माने यांचे खांद्याला अडकावलेल्या बॅगला खालच्या बाजूस कशाने तरी कापून बॅग मध्ये ठेवलेले 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,000₹ असा एकुण 67,000₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या कलावती माने यांनी दि.12.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.