कळंब :आरोपी नामे-शुकुर गफार मनियार, वय 40, 2) फैज शुकुर मनियार, वय 22 वर्षे, 3) फरहान शुकुर मनियार, वय 19 वर्षे रा. इस्लामपुरा झोअर हायस्कुलच्या पाठीमागे, डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.01.2024 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. कृष्णा मोबाईल शॉपी समोर रोडवर कळंब येथे फिर्यादी नामे-अब्दुल गणी गफार मनियार, वय 57 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भाडंणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड,काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुलगणी मनियार यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324,323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-,1) गणी अब्दुल गफार मनियार, 2) अब्दुल समद गणी मनियार, 3) अब्दुल करीम गणी मनियार सर्व रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.01.2024 रोजी 18.00 वा. सु. कृष्णा मोबाईल शॉपी समोर रोडवर कळंब येथे फिर्यादी नामे-शुकुर गफार मनियार, वय 40 वर्षे, रा. इस्लामपुरा झोअर हायस्कुलच्या पाठीमागे डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ॲटोचे भाडे का घेवून गेलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकु, काठी, बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शुकुर मनियार यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंड्यात हाणामारी
परंडा :आरोपी नामे-1)रविंद्र राजाभाउ लोहार, रा. वाकडी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी यांनी दि. 15.01.2024 रोजी 13.30 वा. सु. वाकडी येथे फिर्यादी नामे-निशा बालाजी लोहार, वय 28 वर्षे रा. वाकडी ता. परंडा जि. धाराशिव, यांना नमुद आरोपीने घाण घाण शिवीगाळ करुन वाईट नजरेने बघत होता. म्हणून फिर्यादीने आरोपीच्या पत्नीस सांगीतल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने सत्तुरने डोक्यात, तोंडावर हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निशा लोहार यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 307, 354(अ), 354(ड), 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुझे छोडोंगे नही बहुत ज्यादा हो गया है” म्हणत उमरग्यात मारहाण
उमरगा :आरोपी नामे-1)साहील समीर शेख, 2) साहील महेबुब सत्तार, 3) आदित्य कांबळे, 4)अभिजीतराव लोहार, 5)आग्येश सगर सर्व रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 15.01.2024 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु. बसस्थानकाचे विरुध्द बाजूस असलेले जालु टी हाउस समोर उमरगा येथे फिर्यादी नामे-अफताब शब्बीर सुलतान, वय 25 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,मारहाण करत असताना फिर्यादी म्हणाले “क्युं मार रे हो”? असे विचारले असता नमुद आरोपींनी आज “तुझे छोडोंगे नही बहुत ज्यादा हो गया है” असे म्हाणून उजवे हातावर दगडाने मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे मित्र अफरोज व मेहराज हे भाडंण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी फर्शी व हंटरने मारहाण केली व फिर्यादीचे खिशातील हुसेन सौदागर यांनी बॅकेचे हप्ते भरण्यासाठी दिलेले 60,000 ₹ काढून घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अफताब सुलतान यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 326, 327, 143, 147, 148, 149, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दारू पिऊन मारहाण
तामलवाडी :आरोपी नामे-1) अर्जुन मनोहर वाघमारे, 2) लक्ष्मण जट्टेथोर, दोघे रा. नांदुरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.01.2024 रोजी 23.30 वा. सु. भिमनगर नांदुरी येथे फिर्यादी नामे- पांडुरंग श्रीमंत साखरे, वय 35 वर्षे, रा. नांदुरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे नमुद आरोपी मेहुणा असुन नमुद आरोपी हा दारु पिवून आला व फिर्यादीचे भावास शिवीगाळ करुन मारहाण करत असताना फिर्यादी व फिर्यादीची पत्नी भाडंण सोडवण्यास गेले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, नायलॉन दाव्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पांडुरंग साखरे यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.