कळंब – गावातील महिला बचत गटाने मोठ्या विश्वासाने आपले पैसे गटाच्या सचिवाकडे दिले. पण आता हिशेब मागायला गेल्यावर त्यांना पैशांऐवजी लिंबू-सुया आणि राख मिळत आहे! “पैसे परत मागाल तर वंशाचा दिवा विझवीन,” अशा ‘हॉरर’ धमक्या मिळत असल्याने तांदुळवाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिंबू–सुया पॅकेज : पैशांसोबत मोफत!
गावातील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिवबाईंनी महिलांचा विश्वास जिंकून मोठी रक्कम गोळा केली. मात्र, पैसे मागायला गेलेल्या महिलांना घराच्या अंगणात लिंबू, सुया, राख सापडू लागली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही ‘अलौकिक’ हालचाली कैद झाल्या, पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने महिला हतबल झाल्या आहेत.
सचिवबाईंची ‘काळी कमाई’!
सचिवबाईंचा हिशेब विचारला तर त्या गुपचूप ‘जादू’ वापरायच्या. महिलांनी धाडसाने पैसे मागायला जावे, तर त्यांच्या घरासमोर ‘वंशाचा दिवा विझवू’ अशी धमकी दिली जायची. हे ऐकून काही महिला घरात ‘बत्ती’ पेटवून बसल्या!
गावात भीतीचा माहोल!
या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीती पसरली आहे. काहींनी आपल्या घरात चुकूनही लिंबू आणायचे टाळले आहे, तर काहींनी स्वयंपाकघरातील सुया लपवून ठेवल्या आहेत. गावातील वयोवृद्ध आजी आजच्या काळातही ‘काळी जादू’ प्रभावी ठरतेय का, असा गहन विचार करत बसले आहेत.
“लिंबू सरबत करून प्या” – पोलिसांचा भन्नाट सल्ला!
बचत गटाच्या महिलांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या सचिवबाईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी फसवणूक झालेल्या महिलांनाच भन्नाट सल्ला दिला – “तिने दिलेला लिंबू सरबत करून प्या!”
कळंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलांना न्याय मिळतोय की नव्हे, हे माहित नाही. पण त्यांना लिंबूपाणी मिळालं एवढं नक्की!
फसवणुकीचा ‘रसाळ’ प्रकार!
काळ्या जादूची भीती दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या सचिवबाईंच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी काही महिलांनी पोलीस ठाण्याचा रस्ता धरला. पण पोलिसांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर गंभीर कारवाई करण्याऐवजी ‘लिंबू सरबत करून प्या’ असा ‘थंडगार’ सल्ला देऊन महिलांची निराशा केली.
लिंबू–सुया की लिंबू सरबत?
महिलांना न्याय देण्याऐवजी पोलिसांनी हा प्रकार फसवणूक आहे की फक्त लिंबूंचा ‘ओव्हरसप्लाय’, याचा विचार करावा, असे सुचवले आहे. त्यामुळे आता या महिलांनी सरबतमधून न्याय शोधायचा की वेगळ्या मार्गाने तक्रार द्यायची, याचा उलगडा होणार नाही.
गावातील एका वयोवृद्ध आजीने या प्रकारावर मिश्कील प्रतिक्रिया दिली – “हिचं लिंबू चालतंय, पण आमच्या डाळीला भाव नाही!”
आता पाहायचं एवढंच की, पोलिसांची ‘लिंबूनीती’ किती काळ चालते आणि अखेर या महिलांना न्याय मिळतो की नाही!
बचत गटाच्या महिलांना लाखोंचा गंडा – काळी जादू, लिंबू-सुया आणि पोलिसांचा ‘सरबत सल्ला’!
गावातल्या महिलांनी कष्टाने पैसे वाचवले, ते विश्वासाने बचत गटाच्या सचिवाकडे दिले, आणि आता त्यांना परतफेडीऐवजी घरासमोर लिंबू-सुया आणि राख मिळतेय! तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही भन्नाट सल्ला दिला – “लिंबू सरबत करून प्या!”
कोण फसले, किती फसले?
या प्रकरणात अनेक महिलांनी लाखोंची बचत गमावली आहे. त्यातील प्रमुख पीडित महिला आणि त्यांच्या फसवणुकीचा आकडा असा आहे:
- शीला चंद्रकांत डिकले – ₹1,00,000
- मधुसुनिता संदीप काळे – ₹2,50,000
- धनश्री रमेश पवार – ₹1,00,000
- सुमन बापूराव भालेकर – ₹50,000
- सिंधु किसन माने – ₹80,000
- अनुसया पांडुरंग डिकले – ₹55,000
- सविता श्रीराम काळे – ₹20,000
कोण आहेत ‘लिंबू-सुया’ मास्टरमाइंड?
या फसवणुकीमागे काही संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. हेच लोक महिलांच्या पैशांवर हात मारून त्यांना काळी जादूची भीती दाखवत होते:
- श्रीकांत बाबुराव माने – भोंदूबाबा/आरमोळी
- भैय्या महाराज – आध्यात्मिक ‘बिझनेसमन’
- समर्थ ज्वेलर्स (प्रोप्रा. भोस) – पैसे गुंतवणुकीत हात
- सचिन पांडुरंग डिकले – मुख्य आरोपी
- सुनिता सचिन डिकले (मो. 8010073457 / 9022827932)
- ज्योती निलेश कोठावळे (लातूर) (मो. 9765394192)
- निलेश कोठावळे – संशयित गुंतवणूकदार
लिंबू, सुया आणि राख – न्याय कुठे?
या फसवणुकीमुळे गावात भीतीचं वातावरण आहे. महिलांच्या घरासमोर लिंबू, राख, सुया टाकल्या जात आहेत. कोणाच्या अंगणात राख पडली की लोक नळाच्या पाण्याने अभिषेक करू लागले आहेत.
महिलांनी कळंब पोलिसांकडे तक्रार केली. पण गुन्हा दाखल होण्याऐवजी त्यांना ‘लिंबू सरबत’ करण्याचा सल्ला मिळाला! आता हे सरबत पोलीस स्वतः प्यायला सांगतायत की आरोपींनी आधीच प्यायला घातलंय, हेच कळत नाही!
आता पुढे काय?
गावकऱ्यांनी ठरवलं आहे – ‘सरबत नको, न्याय हवा!’ आता पोलिसांनी कारवाई करावी, नाहीतर हा विषय सरळ थेट सोशल मीडियावर आणि न्यायालयात जाईल!
बघू, या लिंबू-सुया मास्टरमाइंडचं पुढे काय होतं ते!