धाराशिव: खानापूर बसस्थानकाजवळ एका तरुणाला आणि त्याच्या आईला मारहाण करण्यात आल्याची घटना १४ डिसेंबर रोजी रात्री घडली. योगीराज झेंडे (३३) या तरुणाने पानटपरीजवळ डब्ब्यातून पत्ती काढली म्हणून सुशांत भुजंग झेंडे, रानबा झेंडे, मिटु सुशांत झेंडे आणि संकेत लखन झेंडे या चौघांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी योगीराज यांची आई सवर्णा झेंडे आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी योगीराज झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव सिध्देश्वर मध्ये तरुणाला मारहाण
धाराशिव: वडगाव सिध्देश्वर येथे एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १५ डिसेंबर रोजी दुपारी घडली. दिपक आडगळे (२७) हा तरुण लहान मुलांना लग्नाची वरात दाखवण्यासाठी प्रेम म्हेत्रे यांच्या घराजवळ गेला असता आण्णा राणबा जाधव याने त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि पितळी पुंगीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी दिपक आडगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.