लोहारा : धाराशिव जिल्ह्यातील मोघा खुर्द येथे शेतातील झाडांना पाणी देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला असून, त्यातून हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी 8.30 वाजता मोघा खुर्द येथील शेत गट क्रमांक 296 मध्ये ही घटना घडली. फिर्यादी आर्चना बालाजी सोनटक्के (वय 36 वर्षे, रा. मोघा खुर्द, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाणीपुरवठ्यावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
आरोपींची नावे
घटनेतील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- दयानंद शिवराम सोनटक्के
- सुधाकर शिवराम सोनटक्के
- सरोज दयानंद सोनटक्के
- वंदना सुधाकर सोनटक्के
- योगेश दयानंद सोनटक्के
- सोमनाथ दयानंद सोनटक्के
(सर्व राहणार मोघा खुर्द, ता. लोहारा, जि. धाराशिव)
फिर्यादी आर्चना सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.