तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरगाव येथे मागील भांडणाचे कारणावरून एका व्यक्तीवर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शंकर हरीदास डोके (वय ४०, रा. सावरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमेश्वर मल्लिकाअर्जुन स्वामी (वय ४८, रा. सावरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता गणपती मंदिराच्या ओट्यावर शंकर डोके यांनी त्यांना मागील भांडणाचे कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून दाताने चावा घेतला. या मारहाणीत स्वामी जखमी झाले असून, डोके यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात डोके यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.