बेंबळी – एका गावातील २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीने बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी तरुण गेल्या एक वर्षापासून तिला लग्नाचे आमिष दाखवत होता.
दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी तरुणी घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित तरुणीने ३० ऑक्टोबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम-64(2)(एच),64(2)(एम),351(2)(3) अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1) (आर), 3(1)(एस), 3(1) (डब्ल्यु) अन्वयेगुन्हा दाखल केला आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.