• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या रिव्हॉल्व्हरमधून मिस फायर , तेरा वर्षाचा मुलगा जखमी

admin by admin
October 17, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या रिव्हॉल्व्हरमधून मिस फायर , तेरा वर्षाचा मुलगा जखमी
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पुणे – धनकवडीतील वनराई कॉलनीत राहणाऱ्या निवृत्त लष्करी जवानाच्या रिव्हॉल्व्हरला धक्का लागल्याने गोळीबार झाला. यात १३ वर्षीय मुलगा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अभय नितीन शिर्के (१३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के (४०, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नितीन शिर्के हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे खासगी सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी रिव्हॉल्व्हर कपाटातील एका पिशवीत ठेवली होती. रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. शिर्के यांचा मुलगा अभय हा सातवीत शिकतो.

मंगळवारी दुपारी तो घरात होता. दुपारी सव्वातीनच्या सुमारास अभयने कपाट उघडले असता रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या पिशवीला धक्का लागला. पिशवी जमीनीवर पडली आणि रिव्हॉल्व्हरचा चापावर दाब पडला. त्यामुळे गोळीबार झाला. रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी अभयच्या पायातून आरपार गेली. त्यावेळी अभयची आई आणि लहान भाऊ घरात होते.

शिर्के यांच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

Previous Post

बोगस मतदार नोंदणी चालू असल्याचे वृत्त खोटे

Next Post

धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group