धाराशिव: बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचा दावा करणारा आशिष विसाळ हा केवळ बनावट पीए नव्हे, तर मोठा खंडणीखोर आणि ब्लॅकमेलर निघाला.
बनावट पीए कसा झाला खरा?
- दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार असताना, सुरेश धस यांच्या संपर्कात आशिष विसाळ आला.
- त्याने धाराशिवमध्ये स्वतःला आ. धस यांचा खासगी पीए म्हणून दाखवले आणि त्यांच्या लेटरपॅडचा वापर सुरू केला.
- अवैध बांधकामे, नगरपालिका भ्रष्टाचार यांसारख्या प्रकरणांवर खऱ्या-खोट्या सह्या करून तक्रारी दाखल करू लागला.
- वृत्तपत्रांत त्याच्या तक्रारींच्या बातम्या झळकू लागल्या आणि तो प्रसिद्धीत आला.
“हरीकल्याण येळगट्टे करू” धमकी आणि ब्लॅकमेलिंगचा कळस
- धाराशिव नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांच्याविरुद्ध तक्रारी करून त्यांना सहा महिने तुरुंगात राहावे लागले.
- सात अन्य कर्मचारीही रडारवर होते, एसआयटी स्थापन झाली आणि चौकशी सुरू झाली.
- आता याच काळात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या भामट्याला भररस्त्यात तुडवले!
- तो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देत होता – “तुमचा हरीकल्याण येळगट्टे करू” आणि खंडणी वसूल करत होता.
देशमुख हत्येच्या मदतीच्या नावाखाली खंडणी
- स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे असे सांगून त्याने देणग्या गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे बिंग फुटले.
- यावर मराठा कार्यकर्त्यांनी त्याला भररस्त्यात तुडवलं आणि त्याचा भांडाफोड केला.
आ. सुरेश धस यांनी हात झटकले, पण पोलीस तक्रार करणार का?
- या प्रकारानंतर आ. सुरेश धस यांनी स्पष्ट केले की, आशिष विसाळ याच्याशी माझा कोणताही संबंध नाही.
- पण मोठा प्रश्न असा आहे – “जर संबंध नाही, तर आ. धस स्वतः या भामट्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज करतील का?”
बायकांमध्येही नाद – लॉजवरील रेडमध्ये सुटला धस यांच्या नावावर?
- तुळजापुरातील एका लॉजवर पडलेल्या पोलिसांच्या रेडमध्ये तो सापडला होता.
- मात्र, आ. धस यांचे नाव सांगून तो पोलिसांच्या तावडीतून सुटल्याचे बोलले जात आहे.
➡ संपूर्ण प्रकरणात आता पोलीस तपास गती घेतो का?
➡ या भामट्याला अजून कोणाचा वरदहस्त होता?
➡ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फसवणाऱ्या या टोळीचा अजून काही रहस्य बाहेर येणार का?