लोहारा पोलीस ठाण्यात पुर्वी मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय ओमप्रकाश मनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोसायटी आणि तिच्या पदाधिकाऱ्यांनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून 71,98,702 रुपयांची ठेव रक्कम आणि त्यावरील व्याज परत न करता फसवणूक केली आहे.
या प्रकरणात अभय शत्रुघ्न साळुंखे (उप चेअरमन), कल्लेश्वर नारायणराव जाधव (तंज्ञ संचालक), राजु उत्तम गोसावी (संचालक), बाळासाहेब ज्ञानेश्वर शेळके, ज्योती शत्रुघ्न साळुंखे, वंदना शरद दिक्षीत, राजेंद्र महारुद्र जाधव, सचिन दिंगबर कदम, दिलीप लक्ष्मण सिंदफळे, प्रफुल्ल माणिकराव बाबळसुरे, लक्ष्मण विश्वनाथ कोळगे, गोविंद वसंतराव पवार आणि संजय गोपीनाथ जेटीधारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भादंवि कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2), 3(5) सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षणअधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.