कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी पाटी येथे दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात विलास अंकुश कवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, रामराजे वष्णु कवडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
विलास कवडे आणि रामराजे कवडे हे मोटारसायकलवरून कन्हेरवाडी पाटीकडे जात असताना एमएच 12 एफपी 9160 क्रमांकाच्या टाटा व्हिस्टा कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. कारचालकाच्या हयगयी आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी विशाल विलास मिटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 281, 106(2), 125(अ), 125(ब) सह मोटार वाहन कायदा कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.