धाराशिव – काही दिवसांपूर्वी गाजलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण अजून जनमानसाच्या स्मरणात असतानाच, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही शंका आणि संशयाची सुई निर्माण झाली आहे. सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू झाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे केली आहे.त्यावर डॉ. सचिन ओम्बासे यांनी खुलासा केला आहे.
माझे वडील प्राध्यापक होते हे खरे असले तरी माझी आई गृहिणी होती. २०१२ – १३ माझे वडील सेवानिवृत्त झाले आणि मी upsc ची परीक्षा २०१५ मध्ये ओबीसी मधून दिली आहे. सुरुवातीला उत्त्पन्न जास्त होते म्हणून मी चार परीक्षा ओपन मधून दिल्या आणि जेव्हा उत्पन्न कमी झाले तेव्हा ओबीसी मधून परीक्षा दिली.
धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात
मला जेव्हा लोकसेवा आयोगाकडून विचारणा होईल तेव्हा मी सर्व खुलासा करेन. मी माझ्या सर्व्हिसमध्ये चांगले आणि प्रामाणिक काम केलं आहे.,असेही त्यांनी सांगितले.
सविस्तर खुलासा ऐका