नळदुर्ग : फिर्यादी नामे- अब्दुल करीम गुलाम रसुल शेख, वय 54 वर्षे, रा. गुलाम रसुल शेख हाउस नं 453/बी कल्याण रोड अल्हदा मदरशा जवळ वस्ती भिवंडी ता. भिंवडी जि. ठाणे व सोबत सना बानु अब्दुल करीम शेख, समीरा बानु दादापीर मकानदार, मयत नामे- सुमय्या बानु दादापीर मकानदार, वय 17 वर्षे, रा.मुकरंबा ता चिंचोली जि. कलबुर्गी व आरोपी नामे- दादापीर माशीम शाह मकानदार, वय 46 वर्षे, रा. मुकरंबा ता. चिंचोली जि. कलबुर्गी असे दि.03.05.2024 रोजी 06.45 वा. सु. एस पी पेट्रोल पंपासमोर जळकोट शिवार येथुन वाहन क्र एमएच 47 क्यु 7417 मधून जात होते. दरम्यान आरोपी नामे- दादापीर माशीम शह मकानदार यांनी नमुद वाहन हे हायगय व निष्काळजीपणे चालवल्याने अपघात झाला. या अपघातात सुमय्या बानु दादापीर मकानदार या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तर अब्दुल करीम गुलाम रसुल शेख, सना बानु अब्दुल करीम शेख, समीरा बानु दादापीर मकानदार व आरोपी हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल करीम शेख यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
निष्काळजीपणे यंत्र चालवून मरणास कारणीभूत
बेंबळी : मयत नामे- रसुल जाफर शेख, वय 35 वर्षे, र. गायरान वस्ती, करजखेडा ता. जि. धाराशिव हे दि. 23.04.2024 रोजी 17.00 वा. सु.करजखेडा शिवारात चंद्रकांत विठ्ठल हलगुंदे यांचे शेतातील विहीरीवर खोदकम करत असताना विहीरीतील दगड काढणारे पोकलॅण्ड चालकआरोपी नामे- गोविंद मिसाळ रा. मार्डी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील पॉकलॅण्ड हे हायगय व निष्काळजीपणे चालवून पोकलॅण्डची समोरील खोऱ्या बकेट हा रसुल शेख यांचे डोक्याला लागल्याने बकेटमधील दगड डोक्यात पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या पैगंबर जाफर शेख, वय 24 वर्षे, रा. करजखेडा गायरान वस्ती ता. जि. धाराशिव यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 287, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
उमरगा :आरोपी नामे-1)सिद्राम प्रकाश कुंभार, वय 29 वर्षे, रा. मदनानंद कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव दि.24.05.2024 रोजी 19.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 1566 हा हैद्राबाद रोउवर उमरगा बसस्थानक समोरील रोडच्या डिवायडरच्या उत्तर बाजूस मध्यभागी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.