धाराशिव : फिर्यादी नामे-युनुस अब्दुल नबी शेख, वय 64 वर्षे, रा. सुलतानपुर जेल समोरता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20, 000₹ किंमतीची स्प्लेंडर प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 7487 ही दि. 23.05.2024 रोजी 21.00 वा. सु. सुलतानपुर जेल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या युनुस शेख यांनी दि. 24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-रोनक प्रदीप नारटा, वय 24 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 23.05.2024 रोजी 16.00 वा. सु. तुळजापूर बसस्थानक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून रोनक नारटा यांचे गळ्यातील अंदाजे 70,000₹ किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली. अशा मजकुराच्या रोनक नारटा यांनी दि. 24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-तात्यासाहेब मनोहर राठोड, वय 48 वर्षे, रा. कावलदरा ता. जि. धाराशिव हे दि. 24.05.2024 रोजी 15.45 ते 16.15 वा सु.प्लॉट ची खरेदी करण्यासाइी एसबीआय बॅक शाखा नळदुर्ग रोड तुळजापूर येथुन रोख रक्कम 6,00,000₹ एसबीआय बॅक पासबुक चेकबुक असे मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 0995 च्या डिग्गीत ठेवून फिर्यादी यांच्या ऑफीस मधील मित्रा सोबत स्पर्श ऑनलाईन ॲन्ड फोटो स्टुडीओ तुळजापूर समोर रोडवर चहा घेत असताना तात्यासाहेब राठोड यांच्या मोटरसायकलच्या डिग्गीतील रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तात्यासाहेब राठोड यांनी दि. 24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-राहुल दगडू जाधवर, वय 37 वर्षे, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे ताडगाव शिवारातील शेतामधील बोअरवेलची मोटार, 400 फुट वायर असा एकुण 21,000₹ किंमतीचा माल हा दि. 21.05.2024 रोजी 19.30 वा. सु. आरोपी नामे- सोमनाथ काशिनाथ चव्हाण, 2) अनिल उर्फ अविनाश अशोक चव्हाण, दोघे रा. लमाण तांडा घारगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या राहुल जाधवर यांनी दि. 24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : दि.27.04.2024 रोजी 22.30 वा. पुर्वी साबळेवाडी येथील क्लिन्टेक सोलर प्लॅटचे 4,500 मिटर लांबीची 6 स्केअर एमएच ची डीसी केबल व एम सी फेर कनेक्टर 180 नग असा एकुण 1,10,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रशांत अशोक गोडसे, वय 30 वर्षे, रा. उमराळे खुर्द ता. दिडोंरी जि. नाशिक यांनी दि. 24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.