नळदुर्ग : नळदुर्ग पो.ठा. चे पथक दि. 15.10.2023 रोजी 17.35 वा. सु. नळदुर्ग पो.ठा. हद्दीत कुन्साळी येथुन रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना गणेश यांचे शेतातील पोल्ट्रीफार्म येथे कुन्साळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- गोरख कृष्णा शिंदे, वय 32 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे लोखंडी धारदार तलवारी लांबी 17 इंच व रुंदी 1.6 इंच असलेली किंमत अंदाजे 250 ₹ ही बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती लोखंडी तलवारी जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 सह मपोका कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने ज्वलनशील पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
नळदुर्ग : आरोपी नामे-1) आनंदा कल्याणी कलशेट्टी, वय 55 वर्षे, रा. व्यास नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.15.10.2023 रोजी 14.30 ते 17.00 वा. सु. व्यासनगर नळदुर्ग येथे आपल्या राहात्या घराचे बाजूस एक मोकळ्या रुम मध्ये बेकायदेशीरपणे विना परवाना सार्वजनिक जिवीतास व मालमत्तेस धोका होईल अशा स्थितीमध्ये स्वताच्या ताब्यात असलेल्या रिक्षामध्ये कॉम्प्रेसर मोटारीच्या साहय्याने घरगुती वापराची टाकी लावून पाईपच्या सहय्याने गॅस किट असलेल्या रिक्षा मध्ये गॅस भरुन मानवी जिवीतास धोका होवून जिवीत किंवा वित्त हानी होवू शकते याची जाणीव असताना ही निष्काळजीपना करुन भा.दं.वि.सं. कलम-285,286 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब : इंदीरा नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथील- मोहिन खुद्दादिन शेख, वय 28 वर्षे, यांनी दि.15.10.2023 रोजी 23.20 वा. सु. आपल्या ताब्यातील स्वीप्ट मारुती सुझुकी कार क्रं. एम.एच.02 डीजे 5562 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.