बेंबळी : फिर्यादी नामे- मोहन भगवान सुलाखे, वय 50 वर्षे, रा. पाडोळी, ता. जि. धाराशिव यांचे शेत गट नं 35 मधील पाडोळी शिवारातील घराचे कडी कोंडा, खिडक्या अज्ञात व्यक्तीने दि. 14.10.2023 रोजी 03.20 ते 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर मशीन व सीसीटीव्ही तिन कॅमेरे अंदाजे 7,000₹ किंमतीचे चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी- मोहन सुलाखे यांनी दि.16.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 457, 380, 511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- भालचंद्र तुकाराम लोमटे, वय 60 वर्षे, रा. कोल्हेगाव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 1,50,000₹ किंमतीची बोलेरो गाडी क्र एमएच 25 आर 7970 ही दि. 16.10.2023 रोजी 00.55 ते 02.00 वा. सु. भालचंद्र लोमटे यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- भालचंद्र लोमटे यांनी दि.16.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- शरद रामा पवार, वय 50 वर्षे, रा. देगाव, ता. मोहोळ जि. सोलापूर यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची होन्डा शाईन कंपनीचा मोटरसायकल क्र एमएच 13 सीआर 4963 जिचा चेसी. नंMe4JC654AHT 006834 व इंजिन नंबर- JC65 ET1010638 ही दि. 15.10.2023 रोजी 00.00 ते 02.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शरद पवार यांनी दि.16.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.