धाराशिव : धाराशिव जिल्हा कारागृहात कोथळी, ता. उमरगा येथील एका आरोपीने गजाला टॉवेल बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-बिरु रामचंद्र गावडे, वय 40 वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा जि. धाराशिव, ह.मु. जिल्हा कारागृह धाराशिव बंदी क्र 843/2023 यांनी दि. 16.10.2023 रोजी 17.10 वा. सु. जिल्हा कारागृह एल बॅरेक मध्ये धाराशिव येथे बंदी असताना त्याचे जवळ असलेले टॉवेलने एल बॅरेकमधील गजाला टॉवेल बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी तुरुंग अधिकारी श्रेणी 02 जिलृहाकारगृह धाराशिव रा. शासकीय निवासस्थान जिल्हा कारागृह धाराशिव यांनी दि.16.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 309 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
भूम :आरोपी नामे- 1) अनिल उर्फ बापू ज्ञानोबा गोफणे, 2)सुरेश ज्ञानोबा गोफणे, 3) अमर अनिल उर्फ बापू गोफणे, 4) प्रतिक सुरेश गोफणे, 5) रेशा सुरेश गोफणे, 6) अलका सुरेश गोफणे सर्व रा. सामनगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 16.10.2023 रोजी 12.30 ते 13.00 वा. सु. सामनगाव येथील शेत गट नं 189 मध्ये फिर्यादी नामे- रत्नदिप शिवाजी चव्हाण, वय 38 वर्षे, रा. वाल्हा, ता. भुम जि. धाराशिव, यांना शेतातील रस्त्याने जाण्या येण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस व त्यांचे वडीलास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रत्नदिप चव्हाण यांनी दि.16.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 323, 341, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरेापी नामे- 1)गोविंद मारुती हाउळ, 2) ओम गोविंद हाउळ, 3) आकाश सोन्या सर्जे, 4) श्रीहरी नेताजी लोंढे सर्व रा. कोंड, ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.10.2023 रोजी 16.00 वा. सु. शेत गट नं 1371 मध्ये कोंड शेत शिवार येथे फिर्यादी नामे- शिवाजी शाहुराज चव्हाण, वय 57 वर्षे, रा. कोंड, ता. जि.धाराशिव शेतीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवार सारख्या दिसणारे हत्याराने, काठीने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचा चुलत भाउ राजेश चव्हाण हा भांडण सोडवण्यास आला असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवारी सारख्या दिसणारे हत्याराने डाव्या हाताच्या करंगळीवर मारुन जखमी केले.अशा मजकुराच्या दादा पवार यांनी दि.15.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.