• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

नवरात्रोत्सवातच मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

admin by admin
October 17, 2023
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा
0
SHARES
102
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार असून भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

 

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करुन महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे देशाला महिला शिक्षणाचा विचार व दिशा मिळाली. ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची राज्य सरकारची अनेक वर्षापासूनची योजना होती. त्या जागेबाबत तेथील पोटभाडेकरुने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून या न्यायालयीन लढ्यात अनेकजण सक्रीय सहभागी होते, याठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठीच्या लढ्याचा मी देखील साक्षीदार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाने पोटभाडेकरुची याचिका फेटाळून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भिडे वाड्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी फुले दाम्पत्याच्या कार्याला साजेसे भव्य राष्ट्रीय स्मारक राज्यसरकारच्यावतीने उभारले जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

Previous Post

जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या

Next Post

धाराशिव जिल्हा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post
धाराशिव जिल्हा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

धाराशिव जिल्हा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब तालुक्यात वाटवडा-वडगाव रस्त्यावर दरोडा! पुलावर दांपत्याला अडवून सोन्याचे दागिने व मोबाईल लुटला

July 27, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापुरात ढेकरी शिवारात पोलिसांची मोठी कारवाई! ९२ हजारांचा बंदीयुक्त गुटखा आणि दुचाकी जप्त

July 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!