तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, त्यामध्ये मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळींचे गुन्हे नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, गंधोरा येथील संतोष मुसळे यांना वालचंद राठोड, विठ्ठल राठोड, नामदेव राठोड, बालाजी राठोड, पंडीत राठोड, सविता राठोड, शांताबाई राठोड, विमल राठोड आणि प्रियंका राठोड यांनी शेत मोजणीच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी मुसळे यांना डोळ्यात चटणी टाकून, शिवीगाळ करून, लाथाबुक्यांनी, कोयता, दगड आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत मुसळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यासोबत असलेल्या प्रविण भोसले, हनमंत जाधव आणि नवनाथ भोसले यांनाही मारहाण करण्यात आली.
आरोपी नामे-वालचंद नामदेव राठोड, विठ्ठल पंडीत राठोड, नामदेव धर्मा राठोड, बालाजी नामदेव राठोड, पंडीत धर्मा राठोड,सविता नामदेव राठोड, शांताबाई नामदेव राठोड, विमल पंडीत राठोड, प्रियंका वालचंद राठोड सर्व रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.10.2024 रोजी 12.00 वा. सु. गंधोरा शेत शिवार गट नं 51 ब मध्ये फिर्यादी नामे-संतोष धनाजी मुसळे, वय 48 रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व प्रविण भोसले, हनमंत जाधव, नवनाथ भोसले यांना नमुद आरोपींनी शेत मोजणीच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गैर कायद्याची मंडळी जमवून डोळ्यात चटणी टाकून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष मुसळे यांनी दि.19.10.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1),115(1),352,189(2),191(
दुसऱ्या घटनेत, जळकोट येथील काशिनाथ गुळे यांना राजेंद्र सोनटक्के, विश्वनाथ सोनटक्के, हरी सोनटक्के आणि सोमनाथ सोनटक्के यांनी शेतीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी नामे-राजेंद्र बाबुराव सोनटक्के, विश्वनाथ बाबुराव सोनटक्के, हरी महादेव सोनटक्के सोमनाथ बाबुराव सोनटक्के सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धराशिव यांनी दि. 11.10.2024 रोजी 12.30 वा. सु. शेत गट नं 123 आलियाबाद शिवारातील शेतात फिर्यादी नामे- काशिनाथ पांडुरंग गुळे, वय 70 वर्षेद्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-काशिनाथ गुळे दि.19.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 352, 351(2),3(5), सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम3(1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.