धाराशिव शहरात काही चाटू पत्रकार आहेत, जे विनयाच्या काठावर बसलेल्या राजाच्या गोष्टींसारखे कार्य करतात. दिवसभर कटोरा घेऊन फिरणारे हे पत्रकार काहीतरी हुकमी मिळवायला हुजरेगिरी करण्यात व्यस्त असतात. कुणी त्यांना शाबासकी देतं, कुणी ओली पार्टी, तर काही थेट रोखचं कॅश! आता साहेबांच्या सोयरसुतकाचा भार उचलणारे हे चाटू पत्रकार म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांच्या खिशातले मोहरे. धाराशिव लाइव्हने त्यांच्या नॉन क्रीमी लेयरच्या बोगस प्रमाणपत्राचा मुद्दा काढला, आणि चाटू पत्रकारांनी लगेचच ‘साहेब, आता काय करायचं?’ असा यक्षप्रश्न विचारायला धाव घेतली.
हे ऐकून साहेब घाबरले! “आता खुलासा करायचा की नाय?” असा त्यांनी स्वतःशीच विचार केला आणि ज्या पद्धतीने त्यांनी खुलासा केला, तो ऐकून सगळेच हतबुद्ध झाले. त्यांनी सांगितलं, “हो माझे वडील प्राध्यापक होते, पण आई गृहिणी होती हो! आणि उत्पन्न कधी जास्त, कधी कमी होतं, मग मी ओबीसी झालो!” असे बेताल म्हणत त्यांनी आणखीच गाळात पाय घातला.
मुद्दा इथे संपला नाही. खरा प्रश्न तर असा आहे, की सन २०११ ते २०१३ या तीन वर्षांत उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडायचं असतं. तेव्हा साहेबांचे वडील प्राध्यापक होते, म्हणजे उत्पन्न कमी होण्याचं गणित कसं काय लागणार? पण चाटू पत्रकारांनी इतकी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली, की साहेबांचा स्वतःच्या पायात अडकलेल्या गाठीला तेच अधिक घट्ट करत बसले.
हा सर्व प्रकार पाहून, हा चाटूगिरीचा पराक्रम कसा अचूक चालतो, याचं धडा घ्यावा लागेल. कधी-कधी गप्प बसणं हे चाटूगिरीपेक्षा शहाणपणाचं ठरतं, हे साहेबांना कुणी सांगायला हवं होतं!
– बोरूबहाद्दर
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे खुलासा करून स्वतः फसले !
धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात