उमरगा : मयत नामे- शिवशंकर अनिल पाटोळे, वय 26 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 08.02.2024 रोजी 18.45 वा. सु. मेन रोड उमरगा लोहारेकर हॉस्पीटलच्या समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.व्ही 1557 वरुन जात होते. दरम्यान ट्रक क्र के. ए. 56- 3542 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालवून शिवशंकर पाटोळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात शिवशंकर पाटोळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद ट्रक चालक हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेता ट्रकसह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिता नागनाथ पाटोळे, वय 50 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
वाशी :आरोपी नामे-प्रशांत प्रकाशराव चौधरी, 2)विकास वासुदेवराव चौधरी, 3) विनयराज वियवासराव देशमुख, 4) सुधीर रामभाउ गाढवे, 5) राहुल रामभाउ गाढवे, 6) वसंत दादासाहेब उंदरे, 7) बालाजी मधुकर चौधरी, 8) बालाजी गणेश येळवे व इतर 08 ते 10 सर्व रा. तांदुळवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 11.02.2024 रोजी 11.00 वा. सु. नमुद आरोपींतानी मा. जिल्हाधिकारी सो यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन तांदुळवाडी शिवारातील भैरवनाथ साखर कारखाना येथे पायी मोर्चा काढून मोर्चा मध्ये जोर जोराने घोषना बाजी करत व वाद्य वाजवत भैरवनाथ साखर कारखाण्याचे समोर रोडवर रस्ता रोको आंदोलन करुन कारखान्यामध्ये जावून गव्हानीतील उसावर बसून स्व:ताचे जिवीतास व कारखाण्यात काम करणारे मजूर यांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पोलीस अंमलदार/ 144 दादाराव शिवाजी औसारे, वय 33 वर्षे, नेमणुक पोलीस ठाणे वाशी यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 188, 336, भा.दं.वि.सं. सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.