धाराशिव :आरोपी नामे-1) सुनिता बागल, 2) संदीप बागल, दोघे रा. निंबोणी बाग तांबरी विभाग धाराशिव ता.जि. धाराशिव 3) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी रा. धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि.18.05.2022 रोजी ते आज पावेतो धाराशिव सहायक निबंधक कार्यालय धाराशिव येथे धाराशिव शिवारातील सर्व्हे नं 28/2 मधील प्लॉट नं 1 मधील 2716-93 चौरस मिटर या जागेवर एकच गृहनिर्माण संस्था स्थापन करणे आवश्यक असताना तीन संस्था स्थापन करुन तिन्ही संस्थेच्या नावाने चुकीच्या पध्दतीने जागेचे वाटप करुन दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करुन फिर्यादी नामे- हेमंत मुकूंद चौधरी, वय 45 वर्षे रा. टी.पी.एस.रोड कॉर्नर यशवंत नगर धाराशिव यांची व इतर सदनिक धारकाची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हेमंत चौधरी यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुरात हुंडाबळी
तुळजापूर : मयत नामे-गायत्री अतिश देवकर, वय 21 वर्षे, रा. हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.02.2024 रोजी 18.00 वा. पुर्वी राहते घरी हडको तुळजापूर येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- अतिश संजय देवकर, 2) स्वाती संजय देवकर, 3) संजय मोहन दरेकर सर्व रा. हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत गायत्री देवकर हीस तुझ्या आई वडीलांनी लग्पामध्ये काही एक करणीधरणी कली नाही. माहेराहून घरसंसार उपयोगी सामान, भांडी व एक लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत शिवीगाळ व माहराण करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून गायत्री देवकर यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवानंद विलास पाटील, वय 41 वर्षे, रा. चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 498(अ), 323, 504, 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.