मुरुम : उमरगा तालुक्यातील शिवाजी नगर तांडा , दाळीब येथे पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट केले म्हणून पाच ते सहा जणांनी मिळून कंत्राटदारास बेदम चोपले आहे.
श्रीकांत ज्ञानु राठोड, महेश चव्हाण, दिपक संजय राठोड, व इतर तीन इसम सर्व रा. शिवाजी नगर तांडा दाळीब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.10.06.2024 रोजी 11.00 वा. सु. शिवाजी नगर तांडा दाळींब येथे फिर्यादी नामे- शफिक वजीर पटेल, वय 52 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांना व सोबतचे कामगार यांना नमुद आरोपींनी पाण्याचे टाकीचे काम बरोबर होत नाही असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी बॅट, पी.व्ही.सी. पाईपाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शफिक पटेल यांनी दि. 10.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेत रस्त्याच्या कारणावरुन लाथाबुक्यांनी मारहाण
बेंबळी : आरोपी नामे-पप्पु मोहन मरगणे, विजय शंकर मरगणे, बबलु मोहन मरगणे, अभिषेक सुरेश मरगणे, सर्व रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 09.06.2024 रोजी 11.00 वा. सु. बेंबळी शेत शिवार येथे फिर्यादी नामे- दुरर्गश शरद गवळी, वय 17 वर्षे, रा. गणेश नगर बेंबळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दुर्गेश गवळी यांनी दि. 10.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.