उमरगा : फिर्यादी नामे-रणजित सिद्राम कटके, वय 50 वर्षे, रा. साने गुरुजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जे 8 अंदाजे 10,000₹ किंमतीचा हा दि. 18.05.2024 रोजी 03.00 वा. सु. रणजित कटके यांचे घरासमोर उभा केलेल्या अशोक लिलॅण्ड गाडीचा काच फोडून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रणजित कटके यांनी दि.20.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-शेख शमसोद्दीन कासीम शेख, वय 42 वर्षे, रा. दर्गाह रोड धाराशिव यांचे तुळजापूर रोडवरील आण्णाभाउ साठे चौक जवळील रॉयल टायर्स हाउस नावाचे दुकानाचे पत्राचे छप्पर काढून आयशर वाहनाचे अपोलो कंपनीचे दोन टायर्स, ॲक्टीव्हा स्कुटीचे एक टायर व रोख रक्कम 10,800₹ असा एकुण 43,084 ₹ किंमतीचा मुद्देमाल हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शेख शमसोद्दीन यांनी दि.20.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 461 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात
उमरगा :उमरगा पो.ठाण्याचे पथक दि.19.05.2024 रोजी 22.45 वा.सु. उमरगा शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील उमरगा बसस्थानक चे बाजूला फ्रेन्डस ज्युस सेंटरच्या पत्राचे शेडच्या आडोशाला उमरगा येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या दोन इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले नावे- मुस्तफा अफसर तांबोळी, वय 31 रा. अंजली नगर लातुर, 2) रफिक हसनमिया शेख, वय 24 वर्षे, रा. सनत नगर गौबी पीर, लिमयेवाडी सोलापूर नॉर्थ असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.