उमरगा : फिर्यादी नामे- गणपती उाप्पाराव गाडेकर, वय 39 वर्षे, रा. शिवपुरी कॉलनी उमरगा ता. उमरगा, जि. धाराशिव यांचे बायपास उमरगा येथील शेत सर्वे नं 331 मधील शेतामधील सोयाबीनचे 10 कट्टे अंदाजे 15,000₹, ज्वारी 01 कट्टा अंदाजे 2,000₹, गहु 02 कट्टे अंदाजे 5,000₹ असा एकुण 22,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि. 22.11.2023 रोजी सायंकाळी 19.00 ते दि. 23.11.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणपती गाडेकर यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे- अमृता विनायक बेडगे, वय 38 वर्षे, रा. बी 101 लेक्वीस्टा जांभुळवाडी रोड आंबेगाव पुणे जि. पुणे या दि. 20.11.2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथुन बसने प्रवास करुन 13.00 वा. सु. कळंब बसस्थानक येथे अमृता बेडगे यांचे पर्स मधील 98 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिण्याचा बॉक्स अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमृता बेडगे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- रुपेश शंकर शिंदे, वय 41 वर्षे, व्यवसाय- बसचालक न 263 कराड आगार, रा. कुंडाळे ता. कराड जि. सातारा हे दि. 23.11.2023 रोजी रात्री 12.00 वा. सु. दि. 24.11.2023 रोजी 09.30 वा. सु. बस क्र एमएच 14 बी.टी. 4431 ही लातुर येथुन कराड कडे जात होते. दरम्यान नमुद बस ही ढोकी येथे उभ्या केलेली असताना अज्ञात व्यक्तीने बसचे डिझेल टाकातील अंदाजे 110 ते 120 लि. डिझेल एकुण 10,600₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रुपेश शिंदे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.