उमरगा :आरेापी नामे- 1) बालाजी गणेश राठोड, 2)विनोद लिंबाजी जाधव, 3) रोहीत अशोक राठोड, 4)शुभम निलु राठोड सर्व रा. कदेरतांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 17.10.2023 रोजी 19.00 वा. सु. बक्रांगी बॅक पॉइंट कदेर येथे फिर्यादी नामे- शुभम विवेक कलशेट्टी, वय 32 वर्षे, रा. कदेर, ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस फोल्डींग चाकूने उजवे मनगटावर मारुन जखमी केले. फिर्यादीचे आई, वडीला, भाउ, भावजई नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन बॅकेच्या सामानाची तोडफोड केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शुभम कलशेट्टी यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरेापी नामे-1) अशोक गोविंदराव गायकवाड, 2) विशाल अशोक गायकवाड, 3) वैभव अशोक गायकवाड, 4) विक्रांत अशोक गायकवाड सर्व रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.17.10.2023 रोजी गुंजोटी ता. उमरगा येथे फिर्यादी नामे- रमन नागनाथ गायकवाड, वय 30 वर्षे, रा. गुंजोटी, ता. उमरगा जि. धाराशिव व त्यांचे वडील यांना मोटरसायकल घरासमोर लाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लाकडाने मारुन जखमी केले.तसेच आई यांना शिवीगाळ करुन विटाने मारहाण केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमन गायकवाड यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
लोहारा : आरोपी नामे-रफिक पठाण, रा. जिजामाता नगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत मयत नामे- शंकर बिभीषन लोभे, वय 46 वर्षे, रा. दयानंद नगर, तुळजापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि.22.09.2023 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. लोकमंगल पेट्रोल पंपाजवळ माकणी ते लोहारा रौडवरुन मोटरसायकल स्कुटी क्र एमएच 25 एवाय 3992 वरुन जात होते. दरम्यान रफिक पठाण यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल स्कुटी ही भरधाव वेगात हायगई व निष्काळजी चालवून आपघात होवून या आपघातात शंकर लोभे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी दत्तात्रय बिभिषन लोभे रा. माकणी, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.18.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.