अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एका भीषण अपघातात 55 वर्षीय चिमा शेटीबा इटकर यांचा मृत्यू झाला. 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता नॅशनल हॉटेल समोरून पायी जात असताना अशोक लिलॅण्ड टॅम्पो क्र. केए 56 6871 ने त्यांना जोरदार धडक दिली. टॅम्पोचालक मंहमद पाशा महेबुबसाब चौधरी यांच्या हायगयी आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या इटकर यांचा जागीच मृत्यू झाला. मयतांचे पुत्र अरुण चिमा इटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात टॅम्पोचालक मंहमद पाशा चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत नामे- चिमा शेटीबा इटकर, वय 55 वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातुर ह.मु. देशमुख वस्ती, अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.18.08.2024 रोजी सांयकाळी 19.00 वा. सु. अणदुर येथील नॅशनल हॉटेल समोरुन पायी जात होते. दरम्यान अशोक लिलॅण्ड टॅम्पो क्र केए 56 6871 चा चालक नामे-मंहमद पाशा महेबुबसाब चौधरी, वय 42 वर्षे, रा. राजेश्वर ता. बस्वकल्याण जि. बिदर यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून चिमा इटकर यांना धडक दिली. या अपघातात चिमा इटकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरुण चिमा इटकर, वय 27 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.