अहो मंडळी, ब्रेकिंग न्यूज तर तुम्ही वाचलीच! परंडा-बार्शी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आणखी दोन ‘शिकारी’ पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, आरोपींचा आकडा आता ‘लकी नंबर आठ’ वर पोहोचलाय. यातले तब्बल पाच ‘परंडेकर’ असल्याने, हे ‘परंडा कनेक्शन’ म्हणजे जणू काही ‘मेड इन परंडा’ ब्रँडच बनलंय राव! मुद्देमालात सापडलेली १० लाखांची टोयोटा कोरोला, एमडी पावडर, गावठी पिस्तूल आणि काडतुसं बघून वाटतंय, हे पेडलर्स नव्हते तर ‘फिरता शस्त्र आणि नशा भांडार’ चालवत होते!
पण थांबा, खरी ‘मसाला स्टोरी’ तर पडद्यामागे आहे!
आपले सध्याचे सोलापूर ग्रामीणचे सिंघम, SP अतुल कुलकर्णी साहेब, आठवतंय? ते पूर्वी धाराशिवचे SP होते. तेव्हाच म्हणे त्यांना या परंड्याच्या ‘ड्रग्ज लिमिटेड कंपनी’ची सगळी ‘कुंडली’ माहिती होती. पण एका ‘पॉवरफुल’ राजकीय नेत्याचा असा ‘वरदहस्त’ होता की, कुलकर्णी साहेबांना फक्त फाईलींवर सह्या करत बसावं लागायचं. आणि त्या नेत्याचा एक कट्टर कार्यकर्ता, परंड्याचा माजी नगराध्यक्ष , तर म्हणे या रॅकेटच्या ‘बिग बॉस’चा खास ‘बॉडीगार्ड’ बनून फिरत होता!
आता येतो खरा ट्विस्ट!
सध्या धाराशिव LCB चे जे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ते पूर्वी परांड्यात असताना म्हणे त्याच राजकीय नेत्याच्या हातचे ‘रिमोट कंट्रोल’ होते. कुलकर्णी साहेबांनी ‘अॅक्शन’ म्हटलं तरी ते नेत्याच्या ‘कट’ची वाट बघायचे. म्होरक्यासोबत तर म्हणे त्यांचे ‘चहा-पाणी’ आणि ‘भाई भाई’ जोरात चालायचे! त्याला इतकी इज्जत मिळायची की जणू तो ड्रग माफिया नाही, तर ‘समाजसेवक’ असावा!
पण म्हणतात ना, ‘Time सबकुछ बदल देता है!’
नेत्याची खुर्ची गेली, ‘राजकीय हवा’ बदलली आणि इकडे कुलकर्णी साहेब सोलापूर ग्रामीणमध्ये रुजू झाले. आता बार्शी त्यांच्या ‘होम ग्राउंड’मध्ये! मग काय, साहेबांनी जुना हिशोब काढला. बार्शीत ‘फिल्डिंग’ लावली आणि परांड्याचे ‘खेळाडू’ एकामागोमाग एक ‘आऊट’ व्हायला लागले. १७ एप्रिलला तीन, १९ एप्रिलला तीन आणि आता २५ एप्रिलला अजून दोन! एकूण आठ बाद! आणि पाच तर परंड्याचेच! म्हणजे बघा, कुलकर्णी साहेबांनी ‘इनडायरेक्टली’परंड्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केलाय!
आणि धाराशिव पोलीस? ते काय करतायत?
अहो, ते म्हणे ‘आमचा काय संबंध?’ म्हणून शांत बसलेत. LCB चे तेच इन्स्पेक्टर साहेब तर आताही म्हणे सांगतात, “अहो, तो मुख्य म्होरक्या (त्याला लाडाने ‘हाजी मस्तान’ म्हणतात म्हणे!) बिच्चारा गरीब आहे! चार पत्र्याच्या खोलीत राहतो!” आता याला म्हणतात ‘खाकी’ची ‘खा-की’ (Khaki-Kha-Ki)! म्हणजे समोर कोट्यवधींचा माल विकणारा ‘गरीब’ आणि पोलीस ‘माहित असूनही अनभिज्ञ’!
तात्पर्य: गुन्हा परंड्यात (धाराशिव जिल्हा), मुख्य आरोपी परंड्याचा, पण कारवाई करतायत बार्शी पोलीस (सोलापूर जिल्हा) कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली! याला म्हणतात ‘बगलेत कळसा आणि गावाला वळसा’! धाराशिव पोलीस मात्र सध्या ‘वेट अँड वॉच’ नाही, तर ‘स्लीप अँड वॉच’ मोडमध्ये दिसतायत! आता मुख्य म्होरक्या कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. तोपर्यंत, बार्शी पोलिसांना सलाम आणि धाराशिव पोलिसांना… काय म्हणावं आता? तुम्हीच सांगा! 😉