• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा येथे मालमत्तेच्या वादातून एकाला मारहाण; सोन्याची साखळी आणि रोकड लंपास

admin by admin
September 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
184
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  येथील मोमीन गल्लीत मालमत्तेच्या जुन्या वादातून एका ५२ वर्षीय व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहम्मदशफी अन्वर हन्नुरे (वय ५२, रा. मोमीन गल्ली, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवारी, २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास घडली. हन्नुरे हे कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी तयारी करत असताना, घराबाहेर मोठा आवाज आल्याने ते बाहेर आले. त्यावेळी, महेदी रहिम हन्नुरे आणि त्याचा भाऊ फरिद रहिम हन्नुरे हे चाँदबी युनुस हन्नुरे आणि इशरत मुस्तफा हन्नुरे यांना शिवीगाळ करत, दगडाने व लोखंडी कटावणीने शटरचे कुलूप तोडत असल्याचे दिसले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हन्नुरे यांनी सांगितले की, या जागेवरून दोन्ही भावांमध्ये गेल्या १८ वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहे. 

याबाबत जाब विचारला असता, “तुझा काय संबंध, मी तुझा काटा काढतो,” असे म्हणत महेदी हन्नुरे याने मोहम्मदशफी हन्नुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत महेदीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ३५,००० रुपये किमतीची ११ ग्रॅमची सोन्याची साखळी ओढून घेतली आणि टिशर्टच्या खिशातील २०,००० रुपयांची रोकड काढून घेतली. तसेच, फरिद हन्नुरे यानेही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोहम्मदहानिफ जब्बार हन्नुरे आणि सद्दाम कादर जिनेरी यांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले. 

हन्नुरे यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी महेदी रहिम हन्नुरे आणि फरिद रहिम हन्नुरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 119( 1 ), 115 (2) , 352, 351 (2 ), 3 (5)  कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विश्वनाथ शिवराम शिंदे करत आहेत.

Previous Post

धाराशिव : चालकानेच मालकाची साडेतीन लाखांची गाडी पळवली

Next Post

तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

Next Post
तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group