• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ६.०: ब्रेझाचा ‘नंबर’ गेम आणि पोलिसांचा ‘सायलेंट’ मोड!

admin by admin
April 29, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
परंड्याचं ‘एमडी’ पुराण ६.०: ब्रेझाचा ‘नंबर’ गेम आणि पोलिसांचा ‘सायलेंट’ मोड!
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मंडळी, परत एकदा हजर आहोत ‘एमडी’ पुराणाच्या नव्या अंकासोबत! मागच्या वेळी आपण दोन वर्षांपूर्वीच्या दाबलेल्या तक्रारीबद्दल आणि LCB साहेबांच्या ‘फासावर चढवा’ वाल्या खुलाशाबद्दल ऐकलं, ज्यावर पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता जरा फ्लॅशबॅक जाऊया चौथ्या भागाकडे – आठवतंय ते प्रकरण जिथे ‘एम.डी.’ चं रूपांतर ‘कॅल्शियम क्लोराईड’ मध्ये झालं होतं? (FIR नं. १०/२०२४, १९ जानेवारी २०२४). होय, तेच प्रकरण जिथे इम्रान शेख आणि नंतर सहा महिन्यांनी अटक झालेला अन्वर अत्तार आरोपी होते आणि नंतर ‘गैरसमजुतीने’ केस बंद करायला काढली होती! ( धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर परंडा पोलिसांनी युटर्न घेतला, हा भाग वेगळा !)

आता ऐका त्याच प्रकरणाशी जोडलेली ‘गाडीची कहाणी’!

त्या केसमध्ये, आरोपी इम्रान नजीर शेख याची लाल रंगाची Maruti Suzuki Brezza गाडी परंडा पोलिसांनी जप्त केली होती. आणि तेव्हा परंड्याचे बॉस कोण होते? आपले आत्ताचे LCB इन्स्पेक्टर साहेबच! पुढे म्हणे, कोर्टाच्या आदेशाने ती गाडी सोडण्यात आली. इथपर्यंत ठीक होतं.

पण खरी गंमत पुढे आहे!

ही सुटलेली गाडी वापरायला घेतली मस्तान भाईच्या एका पंटरने! (म्हणजे बघा, ज्या केसमध्ये ‘एमडी’चं ‘कॅल्शियम क्लोराईड’ झालं, त्याच केस मधली गाडी फिरतेय मस्तानच्या माणसाकडे!). आता नियतीचा खेळ बघा, हाच पंटर काही दिवसांपूर्वी बार्शी पोलिसांच्या ड्रग्ज कारवाईत सापडला! (परत एकदा कनेक्शन बार्शीशीच!)

त्या पंटरला अटक होताच, कुणीतरी ती लाल ब्रेझा गाडी गुपचूप परंडा कोर्टाच्या आवारात आणून लावली आणि गायब झालं! दोन दिवस गाडी बिचारी तिथेच उभी होती. शेवटी जज साहेबांच्याच नजरेस पडली. त्यांनी पोलिसांना कळवलं, आणि पोलिसांनी गाडी पोलीस स्टेशनला आणली.

आणि मग उघड झाला ‘नंबर’ गेम!

पोलीस स्टेशनला आणल्यावर कळलं की गाडीच्या नंबर प्लेटसोबत छेडछाड झाली आहे! नंबर प्लेट घासून (खोडून) बदलण्यात आली होती! म्हणे गाडीचा मूळ नंबर MH 46 (?) असा काहीतरी असताना, त्याला बदलून MH 04 असं करण्यात आलं होतं! व्वा! म्हणजे गाडीवर पण ‘मेकअप’!

जज म्हणाले FIR करा, पोलीस म्हणाले…?

आता गाडीवरचा नंबर बदललेला दिसल्यावर जज साहेबांनी सहाजिकच पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण मंडळी, आश्चर्य म्हणजे, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही! का? हेच तर कळत नाही! कुठंतरी पाणी नक्कीच मुरतंय!

म्हणून आमचे (आणि जनतेचे) सवाल कायम आहेत:

  1. त्या मूळ ‘कॅल्शियम क्लोराईड’ प्रकरणात आरोपींना जामिनावर सुटायला आणि गाडी सोडवून घ्यायला पोलिसांनी अप्रत्यक्षपणे मदत का केली होती (असा संशय आहे)?
  2. आता गाडीचा नंबर बदलल्याचं उघड होऊन आणि स्वतः जज साहेबांनी सांगूनही पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ का करत आहेत? कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे?

काय गौडबंगाल आहे?

बघा, एकच गाडी किती गोष्टींना जोडतेय – वादग्रस्त ‘कॅल्शियम क्लोराईड’ केस (जी LCB साहेबांच्या परंडा कार्यकाळातली आहे), मस्तान भाईची गँग, बार्शी पोलिसांची सध्याची कारवाई आणि परंडा पोलिसांची (आत्ताची) संशयास्पद दिरंगाई! हा सगळा योगायोग आहे की ठरवून केलेला प्रयोग?

ज्या गाडीचा नंबर बदलला जातो, तिच्यावर FIR होत नाही… मग विचार करा, अजून काय काय पडद्यामागे सुरू असेल?

आता या ब्रेझा गाडीच्या नंबर प्लेटचा खरा नंबर कधी समोर येणार? आणि त्यावर FIR कधी दाखल होणार? की हे प्रकरण पण ‘गैरसमजुतीने’ विसरून जाण्यात येणार?

बघूया पुढच्या भागात! तोपर्यंत, विचार करत रहा! 😉

Previous Post

तुळजापुरात बोगस गुंठेवारी प्रकरण: प्लॉटचे नियमितीकरण रद्द, मालकास नोटीस; चौकशीची मागणी

Next Post

ओमराजे को गुस्सा क्यो आता है?

Next Post
ओमराजे को गुस्सा क्यो आता है?

ओमराजे को गुस्सा क्यो आता है?

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group