• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“बुलेट वेडीवाकडी का चालवतो?” विचारल्याचा राग, परंड्यात एस.टी. चालकास बेदम मारहाण

admin by admin
September 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – “मोटरसायकल वेडीवाकडी का चालवतोस?” अशी विचारणा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून परंडा बस आगारात एका एस.टी. चालकाला दोघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी चालकाला जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत चंद्रकांत औताडे (वय ४२, रा. गोरमाळा, ता. भुम) असे मारहाण झालेल्या एस.टी. चालकाचे नाव आहे. ते परंडा डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते परंडा बस आगारात कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी सोमनाथ मिस्कीन (रा. डोमगाव) व त्याचा एक साथीदार बुलेट मोटरसायकल वेडीवाकडी चालवत होते.

त्यावेळी चालक औताडे यांनी त्यांना “बुलेट वेडीवाकडी का चालवतो?” असे विचारले. याचा राग मनात धरून आरोपी सोमनाथ मिस्कीन व त्याच्या साथीदाराने औताडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

या घटनेनंतर चालक प्रशांत औताडे यांनी तात्काळ परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सोमनाथ मिस्कीन व त्याच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 121(2), 224, 351(2), 3(5) आणि 221 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: लग्नाचे आमिष दाखवून पैशांची मागणी, मानसिक त्रासाला कंटाळून ३० वर्षीय महिलेची आत्महत्या

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; शेती साहित्य आणि वाहनाचे पार्ट लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; शेती साहित्य आणि वाहनाचे पार्ट लंपास

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण

October 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
  • कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण
  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!