तुळजापूर : शहरापासून जवळच असलेल्या काक्रंबा शिवारातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना मिळताच, पोलिसांनी या लॉजवर छापा मारून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात काही आंबटशौकीन सापडले होते, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन सोडण्यात आल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.
आरोपी नामे- 1)किसन नागनाथ कठारे, वय 32 वर्षे, न्हावी गल्ली महादेव गल्ली पाठीमागे औसा ता. औसा जि. लातूर ह.मु. राजे लॉज शिवार काक्रंबा, 2) अविनाश दिनकर माळी, वय 24 वर्षे, रा. पांढरे वस्ती नागरसोगा ता. औसा ह.मु. राजे लॉज काक्रंबा शिवार ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी संगणमत करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दि.14.06.2024 रोजी 17.15 वा सु काक्रंबा शिवारातील श्री.राजे लॉजवरती येथे एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
या छाप्यात काही आंबटशौकीन सापडले होते तसेच आणखी दोन महिला तिथे होत्या. असे असताना, त्यांना अभय देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, दोषींविरुद्ध कारवाई कऱण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तुळजापुरात चोरी
तुळजापूर : फिर्यादी नामे- महेश संतोष काटवटे, वय 25 वर्षे, रा. विरहाणुमंत वाडी लातुर ता. जि. लातुर ह.मु. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आरोपी नामे- बालाजी सोनटक्के रा. विरहाणुमंत वाडी लातुर ता.जि. लातुर यांनी दि. 27.05.2024 रोजी 12.00 ते दि. 28.05.2024 रोजी 00.30 वा. सु महेश काटवटे यांच्या राहते घरुन अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश काटवटे यांनी दि.15.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.