धाराशिव : जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात व ग्रामीण भागात अनेक मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत.
- धाराशिव शहर पोलीस ठाणे: पिंपरी येथील सूरज गरड यांची 20 हजार रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर मोटरसायकल चोरीला गेली आहे.
- उमरगा पोलीस ठाणे: कदेर येथील विजय पाटील यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो फॅशन प्रो मोटरसायकल त्यांच्या घरासमोरून चोरी झाली आहे.
- ढोकी पोलीस ठाणे: कोंड येथील इष्टलिंग शेटे यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो स्पलेंडर मोटरसायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
- नळदुर्ग पोलीस ठाणे: जळकोट येथील अंकुश लोखंडे यांचे 22 हजार 500 रुपये किमतीचे सौर ऊर्जा साहित्य त्यांच्या शेतातून चोरीला गेले आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेतली असून, चोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.