• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ‘बॉस’चा धुमाकूळ! लाचखोरी, दारूच्या गाड्यांची ‘सेटिंग’ आणि आता चक्क ठाण्यातच दारूच्या बाटल्यांसोबत ‘बर्थडे सेलिब्रेशन’

admin by admin
March 17, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ‘बॉस’चा धुमाकूळ! लाचखोरी, दारूच्या गाड्यांची ‘सेटिंग’ आणि आता चक्क ठाण्यातच दारूच्या बाटल्यांसोबत ‘बर्थडे सेलिब्रेशन’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा खाकी वर्दीचे धिंडवडे कसे निघतात, याचा जिवंत पुरावा सध्या धाराशिव शहर पोलीस ठाण्यात पाहायला मिळत आहे. बाजारात ‘झिरो पोलिसा’मार्फत हप्तेखोरी, दारू तस्करांसोबत ‘आर्थिक तडजोड’ करून गाड्या सोडण्याचा प्रताप आणि आता चक्क पोलीस ठाण्यातच ‘बॉस’ नावाचा केक कापून रिकाम्या दारूच्या बाटल्यांच्या साक्षीने साजरा झालेला वाढदिवस… या सर्व संतापजनक प्रतापांचा केंद्रबिंदू ठरले आहेत शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार विष्णू बेळे! या एकाच कर्मचाऱ्याने पोलीस विभागाच्या शिस्तीचे तीनतेरा वाजवले असून, वरिष्ठ अधिकारी या ‘बॉस’वर कठोर कारवाईचा बडगा उगारणार की त्यांना पाठीशी घालणार? असा संतप्त सवाल धाराशिवकर विचारत आहेत.

पोलीस ठाणे की दारूचा अड्डा? खिडकीत रिकाम्या बाटल्या आणि ‘बॉस’चा केक!

शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून शहर पोलीस ठाण्यात चक्क ‘बॉस’ लिहिलेला केक कापून अंमलदार विष्णू बेळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कहर म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या वाढदिवसाच्या फोटोंमध्ये पोलीस ठाण्याच्या खिडकीत चक्क दारूच्या चार रिकाम्या बाटल्या स्पष्ट दिसत आहेत! आधीच एका प्रकरणात कार्यालयीन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या या महाशयांनी पोलीस ठाण्यालाच दारूचा अड्डा बनवले की काय? असा संशय यातून निर्माण झाला आहे. हा ‘जल्लोष’ कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याचे उत्तर पोलीस प्रशासनाला द्यावेच लागेल.

‘आर्थिक तडजोड’ करून दारूची गाडी सोडली; सीसीटीव्ही तपासा!

या ‘बॉस’ची मस्ती केवळ वाढदिवसापुरती मर्यादित नाही. अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्याच्या नावाखाली मोठी ‘माया’ गोळा केल्याचा गंभीर आरोपही बेळे यांच्यावर आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे गणेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी शिवाजी महाराज चौक ते ॲक्सिस बँक परिसरात बेळे आणि त्यांच्या पथकाने अवैध दारूने भरलेली इंडिगो गाडी ( MH 24 L 0072) पकडली होती. मात्र, गाडीत दारूचा मोठा साठा असतानाही, केवळ २५८० रुपयांच्या बाटल्या जप्त केल्याचे रेकॉर्डवर दाखवण्यात आले. उर्वरित दारू आणि ती गाडी ‘आर्थिक तडजोड’ (चिरीमिरी) करून सोडून देण्यात आली. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी शहर पोलीस स्टेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तात्काळ तपासणी करून बेळे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समितीने विशेष पोलीस महानिरीक्षक आणि अधीक्षकांकडे केली आहे.

‘झिरो पोलिसा’ची वसुली; आधीच एक वेतनवाढ रद्द!

अंमलदार बेळे यांचा भ्रष्टाचाराचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहता हे नवे प्रताप अजिबात आश्चर्यकारक नाहीत. काही दिवसांपूर्वीच धाराशिवच्या आठवडी बाजारात एका केळीच्या गाड्यावर ‘झिरो पोलिसा’मार्फत हप्ता स्वीकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या पैशांच्या ‘डील’ प्रकरणी बेळे यांची एक वेतनवाढ (इन्क्रिमेंट) रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीही खाकी वर्दीचा माज आणि ‘बॉस’गिरी जिरलेली नाही, हेच या ताज्या घटनांवरून स्पष्ट होते.

वरिष्ठांचे डोळे कधी उघडणार?

एकामागून एक असे गंभीर आणि लाजीरवाणे प्रकार उघडकीस येऊनही शहर पोलीस ठाण्यात हा ‘नंगानाच’ बिनदिक्कत सुरू आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही, तर सामान्य माणसाचा पोलिसांवरचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल. आता धाराशिवचे पोलीस अधीक्षक या खिडकीतील ‘बाटल्या’, ‘बॉसचा केक’ आणि दारू माफियांशी केलेल्या ‘आर्थिक तडजोडी’ची गंभीर दखल घेऊन या ‘बॉस’ला त्याची खरी जागा दाखवणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.


Previous Post

‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ रेल्वेसाठी तत्काळ एक हजार कोटी द्या!

Next Post

नव्या जोडप्याला मूल झालं तरी राणा पाटील त्याचेच श्रेय घेतील

Next Post

नव्या जोडप्याला मूल झालं तरी राणा पाटील त्याचेच श्रेय घेतील

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!