धाराशिव: पंचायत समिती लोहारा येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. निखिल लिंबराज मस्के (वय २८) असे या अभियंत्याचे नाव असून त्याने तक्रारदाराकडे घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ५००० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानंतर २ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी सापळा रचून मस्के याला ३००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मस्के याच्यावर पोलीस ठाणे मुरूम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
संपर्क:
- अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव – ०२४७२-२२२८७९
- टोल फ्री क्रमांक – १०६४