• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अफू लागवड प्रकरणी समाधान उघडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

admin by admin
February 13, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अफू लागवड प्रकरणी समाधान उघडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून समाधान मनोहर उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अफू (Afu) लागवडीप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान उघडे (रा. तसमगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पक्षाच्या स्तरावरही चौकशी करण्यात आली. संबंधित कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

खासदार ओमराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, “समाधान उघडे यांनी केलेले बेकायदेशीर कृत्य गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. पक्षाच्या विचारसरणीला व संघटनात्मक शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात थारा नाही.”

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षशिस्तीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


समाधान उघडे यांच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा

वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात अवैध अफू लागवडीचा मोठा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल 485.65 किलो वजनाची अंदाजे 72 लाख 84 हजार 750 रुपयांची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

सर्वे क्र. 163, मौजे दशमेगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) येथे भेट दिली असता कांद्याच्या आंतरपिकामध्ये मोठ्या प्रमाणात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. संबंधित झाडांना पांढरी व गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असल्याचे निदर्शनास आले.

हे शेत समाधान मनोहर उघडे (रा. दशमेगाव, ता. वाशी) यांचे असल्याची माहिती समोर आली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही त्यांच्याच मार्फत लागवड केल्याचे सांगितले. त्यानंतर नायब तहसीलदार किसन सांगळे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत 485.65 किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली.

 

Previous Post

‘पवित्र’ तुळजापुरात ‘पापा’चा नंगानाच आणि सत्तेचा दुतोंडी बुरखा!

Next Post

धाराशिवमध्ये संतापजनक प्रकार: २५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायात ढकलून लैंगिक अत्याचार; ९ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिवमध्ये संतापजनक प्रकार: २५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायात ढकलून लैंगिक अत्याचार; ९ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!