तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथे बाभळीच्या झाडाच्या तोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना:
दि. 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता सांगवी काटी येथे विनोद तुकाराम मगर (वय 49 वर्षे) यांना विशाल बापूसाहेब मगर (रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर) यांनी बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने मारहाण केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर विनोद मगर यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना:
याच दिवशी, त्याच ठिकाणी विशाल बापूसाहेब मगर (वय 29 वर्षे) यांना बाळू तुकाराम मगर आणि बापू बाळू मगर (रा. सांगवी काटी) यांनी बाभळीचे झाड शेतात का टाकले, असे विचारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कुर्हाडीच्या तुब्यांनी मारहाण केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विशाल मगर यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने सांगवी काटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही गटांच्या वादाचे कारण शोधले जात आहे.