• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन”

सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे यांच्याकडून संताप

admin by admin
January 9, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा; नोडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

संजयकुमार डव्हळे

0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शासन नियमांचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुद्ध असभ्य वर्तन करणे आदी अनियमितता आढळून आल्याने संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांना निलंबित करण्यात आले आहे.

यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे यांनी संताप व्यक्त केला आहे. डव्हळे हे प्रामाणिक अधिकारी असून त्यांना षड्यंत्र करून निलंबित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दराडे यांनी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन” असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गैरप्रकार घडल्याची तक्रार श्री. डव्हळे यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तपासणी सुरू केली होती. हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या विरुद्ध आंदोलन उभे राहिले आणि तडकाफडकी त्यांचे निलंबन झाले.

यामागे मोठे कांड असल्याचा संशय दराडे यांनी व्यक्त केला आहे. श्री. डव्हळे यांच्या निलंबनाने कोणाच्या डोक्यावरची टांगती तलवार बाजूला झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संजयकुमार डव्हळे यांना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आल्याने आपण  महसूल मंत्री यांच्यापर्यंत जाणार असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय ?

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील सर्वे नंबर 176 चा एनए लेआउट धाराशिव तहसीलदारांनी मंजूर केला, तसेच त्याच सर्वे नंबरचा लेआउट तुळजापूर तहसीलदारांनी सुद्धा मंजूर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संपूर्ण 73 प्लॉटच्या लेआउटची खरेदी एका व्यक्तीने 9 डिसेंबर रोजी केली होती.

या प्रकरणी अमोल जाधव यांनी 26 डिसेंबर रोजी धाराशिव तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला. तहसील कार्यालयाचे श्री. डव्हळे यांनी तत्काळ चौकशी करताना अनेक गंभीर गैरप्रकार आढळून आणले. त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. यानंतर 27 डिसेंबर रोजी वादग्रस्त दस्त रद्द करण्यात आले.

दरम्यान, धाराशिव तहसील कार्यालयातील अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमुळे भीतीच्या वातावरणात असलेल्या तहसीलदारांनी घोटाळा उघड करणाऱ्या श्री.डव्हळे यांच्याविरोधात विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणामुळे धाराशिव तहसील कार्यालयातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

  • सामाजिक कार्यकर्त्यांनी डव्हळे यांच्या निलंबनाला षड्यंत्र म्हटले आहे.
  • डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन” असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
  • या प्रकरणाची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Video

Previous Post

उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह; षडयंत्राचा आरोप

Next Post

बेंबळीच्या सरपंच सौ. वंदना कांबळे अपात्र घोषित

Next Post
बेंबळीच्या सरपंच सौ. वंदना कांबळे अपात्र घोषित

बेंबळीच्या सरपंच सौ. वंदना कांबळे अपात्र घोषित

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group