• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, February 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

admin by admin
February 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
230
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी: मेंढा शिवार (ता. धाराशिव) येथील पवनचक्कीवर ड्युटीवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला १२ अज्ञातांच्या टोळक्याने लाकडी काठ्या आणि उसाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. “तुमच्यामुळे आमच्या कंपनीचे नुकसान होत आहे,” असे कारण पुढे करत ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान बंडु चव्हाण (वय २८, व्यवसाय सुरक्षा रक्षक, रा. एकंबीवाडी, ता. औसा, जि. लातूर) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. समाधान हे मेंढा शिवारातील ११३ नंबरच्या पवनचक्कीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दि. ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समाधान हे जमिनीवर पडून मोबाईल पाहत असताना अचानक १२ अनोळखी इसम तिथे आले.

आरोपींनी समाधान यांना, “तुम्हारे वजहसे हमारे कंपनी का नुकसान हो रहा है, तुम ड्युटीपे क्यु आते है,” असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने त्यांना लाकडी काठी आणि उसाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर आरोपींनी समाधान यांची मोटरसायकल आणि मोबाईल फोडला. तसेच घटनास्थळी असलेल्या सतीश सागर यांचाही मोबाईल फोडून नुकसान केले.

याप्रकरणी जखमी समाधान चव्हाण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), १२७(२), ३२४(४), १८९(२), १९० आणि १९१(२)(३) अन्वये दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Previous Post

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group