१३ वर्षांपूर्वी एक वेड घेतलं… धाराशिवसारख्या मागास जिल्ह्यात डिजिटल चॅनल सुरू करण्याचं! तेव्हा लोक हसले, काहींनी वेड्यात काढलं. इंटरनेटच्या २G गतीत आमची धडपड सुरू होती, स्मार्टफोन अपवादानेच दिसायचे, आणि डिजिटल पत्रकारितेचा कुणालाच भरवसा नव्हता. पण आम्ही ठरवलं होतं—यंत्रणेला प्रश्न विचारायचे, अन्यायाला वाचा फोडायची आणि निर्भीड पत्रकारितेचा नवा आदर्श उभा करायचा!
आज १३ वर्षांनी मागे वळून पाहतो, तेव्हा अभिमान वाटतो. धाराशिव लाइव्ह हा आज केवळ एक डिजिटल चॅनल नाही, तर धाराशिवच्या जनतेचा बुलंद आवाज बनलाय. अन्यायाविरोधात लढणारा, सत्ताधाऱ्यांना सवाल करणारा, भ्रष्टाचाराला वेशीवर टांगणारा आवाज!
बातमीचा सौदा नाही – सत्याचा आग्रह!
धाराशिव लाइव्हसाठी पत्रकारिता म्हणजे केवळ व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे. आम्ही आजवर एकही बातमी लपवली नाही, कोणाच्याही दबावाखाली आलो नाही, आणि पैशांसाठी बातम्या दडवल्या नाहीत. सत्ताधाऱ्यांपासून ते माफियांपर्यंत, आमच्या बेधडक बातम्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. भांडाफोड करताना धमक्या आल्या, खोट्या केसेस टाकल्या गेल्या, पण आम्ही झुकलो नाही. कारण पत्रकारिता भीतीने नव्हे, निर्भयतेने जगायची असते!
फक्त वाचकांसाठी – कोणतीही सब्स्क्रिप्शन नाही!
आज डिजिटल मीडियाने पेड सब्स्क्रिप्शनचा मार्ग स्वीकारला आहे. पण आम्ही असं नाही केलं. कारण खरं पत्रकारितेचं उद्दिष्ट हेच—सर्वसामान्य माणसाला, गरीब वाचकाला माहिती मिळाली पाहिजे. अन्यायाविरोधात त्यालाही आवाज उठवता आला पाहिजे. त्यामुळे धाराशिव लाइव्हच्या बातम्या कोणत्याही फीशिवाय, प्रत्येक वाचकासाठी मोफत उपलब्ध आहेत!
धाराशिव लाइव्ह म्हणजे काय?
- आजची बातमी उद्यासाठी नाही—आताच!
- कोणालाही पाठीशी घालत नाही, कोणालाही वाचवताना दिसत नाही!
- सत्याच्या बाजूने उभे, अन्यायाच्या विरोधात कट्टर!
- जनतेचा विश्वास – हीच खरी ताकद!
आवाहन: पत्रकारितेसाठी उभे राहा!
वाचकांनो, हा चॅनल केवळ आमचा नाही, तो तुमचाही आहे. तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. या निर्भीड पत्रकारितेच्या लढ्यात तुम्ही आमच्या सोबत आहात, हीच आमची खरी ताकद आहे. त्यामुळे पुढेही आम्हाला साथ द्या, अन्यायाविरोधात आवाज उठवा आणि सत्यासाठी लढा!
धाराशिव लाइव्ह – धाराशिवच्या लोकांचा, धाराशिवच्या सत्याचा आवाज!