धाराशिव: माजी जिल्हाधिकारी यांचे नाव आणि फोटो वापरून स्वतःला त्यांचा खास मित्र म्हणून मिरवणाऱ्या आणि आमदार सुरेश धस यांच्या नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत खंडणी वसूल करणाऱ्या आशिष विसाळचा नवा कारनामा समोर आला आहे! या भामट्याने केवळ अधिकाऱ्यांना गंडवलं नाही, तर जनतेलाही दिशाभूल करत लाखोंचा गैरव्यवहार केला.
‘शिस्तप्रिय जिल्हाधिकारी’चा गैरवापर!
धाराशिवच्या एका माजी जिल्हाधिकाऱ्यांचा हा भामटा ‘खास मित्र’ असल्याचा दावा करायचा. व्हॉट्सअॅप डीपीवर त्यांचा फोटो ठेवून, त्यांच्या नावाचा उपयोग स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी करायचा. त्या जिल्हाधिकाऱ्यांची लोकांमध्ये प्रतिष्ठा होती, त्यामुळे अनेक जण विसाळला सहज विश्वास ठेवायचे.
‘धस साहेबांचा कार्यकर्ता’ सांगून ‘खंडणी’ वसूल
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “आमदार धस साहेबांचा आदेश आहे! खंडणी द्या, नाही तर विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करतो !” अशा धमक्या देत लाखोंची खंडणी उकळली. विसाळने एवढी मोठी कमाई केली की, १८ लाखांची आलिशान गाडी खरेदी केली आणि खासगी बँकेत तब्बल २ कोटींची ठेव टाकली!
मराठा आंदोलकांचा धडाका आणि पोलिसांची ‘सातबारा चौकशी’ सुरू!
मराठा आंदोलकांनी त्याचा ‘ब्लॅकमेलिंग गेम’ ओळखून भर चौकात ‘हिशोब’ लावल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आता त्याच्या बँक खात्यांवर आणि मालमत्तेवर लक्ष केंद्रीत केलं असून, संपूर्ण चौकशी सुरू केली आहे.
धस यांचा आदेश – ‘तुडवा आणि चौकशी लावा!’
आ. सुरेश धस यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत – “त्याला अजिबात सोडायचं नाही! त्याच्या फोन आणि बँक खात्याच्या डिटेल्सची चौकशी करा. ६ फेब्रुवारीला आष्टीला घेऊन या, तिथे मी त्याला स्वतः बघतो!”
विसाळच्या ‘गैरवापर साम्राज्याचा’ पडदा आता फाटला आहे. पुढील तपासात आणखी किती बळी पडले असतील, याचा उलगडा होईलच!
“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”