धाराशिव – शहरात एका 22 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता ही मुलगी घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. या तरुणाने मुलीला लग्नाची मागणी घातली आणि नकार मिळाल्यावर तिच्यावर मारहाण करून लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेबद्दल कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
एक 22 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 27.09.2024 रोजी 14.30 वा.सु. ही घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून तु मला आवडतेस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे त्यावर नमुद मुलीने विरोध केल्याने सदर तरुणाने तिस मारहाण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पिडीतेची बहिण यांनी दि. 29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलिसांनी आरोपी तरुणावर भा.न्या.सं. कलम- 64(1), 64(2) (के), 75(1), 115(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.