परंडा: परंडा पोलीस ठाणे हद्दीतील दरेवाडी गावठाण येथे एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडसाठी ठेवलेले साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आप्पा सोपान काळे (वय ६५, रा. पारधी पिढी भुम) यांनी दरेवाडी गावठाणच्या हद्दीत पत्र्याचे शेड उभारण्यासाठी काही साहित्य आणून ठेवले होते. यामध्ये २४ पत्रे, १ लोखंडी दरवाजा, १६ तंडू व खिळे, आणि बिजागरी असा एकूण ५५ हजार ५०० रुपये किंमतीचा माल होता.
चोरीची घटना २४ एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ च्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे. याबाबत आप्पा काळे यांनी परंडा पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
तेरणा तलावातील पाणी पुरवठा विहिरीतून मोटारपंप चोरीला
ढोकी (धाराशिव): तेर येथील तेरणा तलावातील पाणी पुरवठा विहिरीतील मोटारपंप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाने ढोकी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा विहिरीतील 10Horse Power चा सबमर्शिबल पंप चोरून नेला. या पंपाची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आहे.
या चोरीची तक्रार ग्रामपंचायत शिपाई अविनाश सिताराम खांडेकर (वय 31, रा. तेर) यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी ढोकी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम 379 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.